Header AD

रिपब्लिकन सेने तर्फे डोंबिवलीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 
डोंबिवली ( शंकर जाधव )  क्रांतीसुर्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने रिपब्लिकन सेनेतर्फे डोंबिवलीत दीनदयाळ चौक,द्वारका हॉटेल समोर,डोंबिवली(प) येथे सकाळी ११.०० ते सायं.५.०० वाजे. भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.कोविड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना रक्तदान करून मदत व्हावी याकरिता हे शिबिर आयोजित केले होते.शासनाचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.सदर रक्तदान शिबिराकरिता शास्त्रीनगर रुग्णालयातील चिदानंद चैरीटेबल ट्रस्ट यांचा कॅम्प लावण्यात आला होता.वाढत्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर वाढते रुग्ण असताना कित्येक ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत आहे,त्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.             महामानवाला वंदन करण्याकरिता कॅम्पच्या शेजारी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सजवण्यात आली होती.डोंबिवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.मोरे साहेब यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पण केले. भारतीय बौद्ध महासभेचे बाबुराव नवसागरे गुरुजी यांनी त्रिसरण,पंचशील,वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली.तर  सदर कार्यक्रमाचे आयोजन आनंद नवसागरे (ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष)यांनी केले होते.कार्यक्रमाचे नियोजन व संकल्पना राजाभाऊ जोशी(कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष)यांची होती.रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना रिपब्लिकन सेनेतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले गेले.                तर कार्यक्रम यशस्वितेसाठीअनंत पारदुले सर(२७ गावे
विभाग प्रमुख, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्षेत्र),राहुल नवसागरे(ज्येष्ठ  नेते,रिपब्लिकन सेना)संभाजी साबणे(कार्याध्यक्ष,डोंबिवली
शहर)रमेशभाऊ ढगे(सचिव,डोंबिवली शहर),परेश जोशी (विभागप्रमुख,डोंबिवली पश्चिम),गणेश आहेर( डोंबिवली पूर्व विभागप्रमुख),कपिल सोनवणे(विभाग संघटक),कुणाल नाईक(सचिव,रिपब्लिकन वाहतूक सेना)यांनी अथक परिश्रम घेतले.
रिपब्लिकन सेने तर्फे डोंबिवलीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न रिपब्लिकन सेने तर्फे डोंबिवलीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads