Header AD

केडीएमसी क्षेत्रात सोडियम हायपो क्लोराइड फवारणीची विशेष मोहिम




कल्याण  , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भाव  आळा घालण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेतयाच उपाययोजनांचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार,  घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी शनिवारी आणि रविवारी महापालिका क्षेत्रात सोडियम हायपो क्लोराइड फवारणीची  विशेष मोहीम हाती घेतली आहे.


 महापालिकेच्या अ,ब व क प्रभाग क्षेत्र परिसरात आज सकाळी ७ ते दु. २ या वेळेत ही मोहीम राबविली  गेलीदुपारच्या सत्रात ३ ते रात्री १० या वेळेत डोंबिवली मधील फ ,ग व ई या प्रभागक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येत आहे . तसेच रविवारी सकाळी ७ ते दु २ या वेळेत कल्याणमधील ड व जे प्रभागक्षेत्रात आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत आय व ह प्रभागक्षेत्रात ही फवारणी करण्यात येणार आहे. 



याकरिता अकरा सिटी गार्ड वाहने,७ फायर फायटर वाहने तसेच प्रत्येक प्रभाग निहाय हॅन्ड फॉग मशीनचा वापर करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी सहा सार्वजनिक अधिकारी घुटेसर्व मुख्य आरोग्य निरीक्षकआरोग्य निरीक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

केडीएमसी क्षेत्रात सोडियम हायपो क्लोराइड फवारणीची विशेष मोहिम केडीएमसी क्षेत्रात सोडियम हायपो क्लोराइड फवारणीची विशेष मोहिम Reviewed by News1 Marathi on April 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads