Header AD

भिवंडीतील आंबाडी नाका येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची नागरिकां कडून मागणी!




भिवंडी दि 10   (प्रतिनिधी )ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी अंतर्गत 27गावे व 54 पाडे कार्यक्षेत्राचा परिसर समाविष्ट आहे.सद्या राज्य शासनाच्या आदेशानुसार 45 वर्ष वयोगटापासून प्रत्येक नागरिकाला कोरोना आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोव्हीशील्ड या लसीकरणाचा पहिला डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.त्यादृष्टीने भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथे लसीकरण सुरू केले आहे.



परंतु वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समाविष्ट असणारी गाव ,पाडे यांचा विचार करता सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणारी गाव,पाडे उदा.देवचोळे,एकसाल,सांगाव इत्यादी गावांचा विचार करता ,येथील लाभार्थ्यांच्या सोईकरता अंबाडीनाका येथे आणखीन एक लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांची आहे,तसेच अंबाडीनाका येथे ग्रामीण रुग्णालय आहे.येथे पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्गही आहे.त्यामुळे लाभार्थी नागरिकांच्या वयोगटाचा विचार करता,आणि सद्यस्थितीत उष्णतेची दाहकता लक्षात घेऊन,शासनाच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच अंबाडीनाका येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु  करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहितीनुसार या केंद्रांतर्गत सुमारे 14 हजार लाभार्थी लसीकरणाचे अपेक्षित आहेत, त्यापैकी आतापर्यंत जवळपास 1500 (पंधराशे)लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असल्याचे समजते.लसीकरणाचा कालावधी आणि लाभार्थी संख्या लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होणार नाही,यासाठी अंबाडीनाका येथे लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
भिवंडीतील आंबाडी नाका येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची नागरिकां कडून मागणी! भिवंडीतील आंबाडी नाका येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची नागरिकां कडून मागणी! Reviewed by News1 Marathi on April 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads