Header AD

रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व सुनियंत्रीत करण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टीचे आंदोलन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व सुनियंत्रीत करण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टीने सह आयुक्त औषध प्रशासन कोकण विभागठाणे यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्येमुळे रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा होत असुन रुग्णांचे हाल होत आहेत. अन्न व औषध प्रशासनच्या निर्देशानुसार रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सर्वच कोविड रूग्णालयांना करणे आहे. तरी देखील कोविड रूग्णालय  व्यवस्थापन रूग्णांना रेमेडिसीव्हर इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत आहे. याबाबत अन्न व औषध अधिकारी यांना तक्रार करुन देखील इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे शासनाच्या नियमानुसार १४७० रुपये मध्ये उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश आहेतपरंतु वितरक ३५०० ते ४००० रुपये रुग्णांकडुन घेत रुग्णांची लुट करत आहेत.ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना रेमेडिसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्याची विक्री, वितरण सुनियंत्रीत करण्यासाठी सह आयुक्त औषध प्रशासन कोकण विभागठाणे यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारीमहासचिव राहुल काटकरकल्याण जिल्हाध्यक्ष हर्षल साळवी व प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटीलशरद सोनवणेदिपक लढे यांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी सह आयुक्त (औषध)कोकण विभाग पौनिकर यांनी त्वरित संबंधितांसोबत चर्चा करुन ४ ते ५ दिवसामध्ये सर्व कोविड रुग्णालय मध्ये इंजेक्शनचा साठा उपलब्ध करणारतसेच रुग्णांना इंजेक्शन शासन मान्य दरानेच रुग्णालयामध्ये उपलब्ध करणार. जे कोणी काळाबाजार व साठेबाजी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथक त्वरित चालु करु असे आंदोलन कर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व सुनियंत्रीत करण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टीचे आंदोलन रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व सुनियंत्रीत करण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टीचे आंदोलन Reviewed by News1 Marathi on April 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads