Header AD

नाशवंत दूध विक्रीस भिवंडीत सायंकाळी मनाई


■म्हशी कसायला विकायच्या का दूध व्यवसायिकांनी मांडली व्यथा ,दूध उत्पादकां वर संकट....


भिवंडी  दि .24 (प्रतिनिधी  ) सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी पोलीस यंत्रणेने सुरू केल्याने भिवंडीत सायंकाळी दूध विक्रीस ही परवानगी नाकारली जात असल्याने भिवंडी शहरात येणारे सुमारे दीड लाख लिटर नासविण्याचे काम प्रशासन करीत असून अशीच परिस्थिती राहिल्यास लाखो रुपये किमतीच्या म्हशी कसायला विकाव्या लागतील अशी व्यथा तबेला मालक दूध उत्पादक शिवराम कदम यांनी मांडली आहे .


          भिवंडी शहरा नजीकच्या ग्रामीण भागात शेकडो ताब्यातून सुमारे 25 हजार म्हशी दुधा साठी सांभाळल्या जात असून त्यापासून सुमारे दीड लाख लिटर दूध उत्पादन हे संपूर्ण तालुक्यासह शहरात वितरित होत असते .परंतु स्थानिक पोलीस रस्त्या कडेला दूध विक्रीस मनाई करीत असल्याने सायंकाळी काढलेल्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न शिवराम कदम यांनी उपस्थित केला असून दूध हे नाशवंत असल्याने व एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूध साठवणूक करणारी कोणतीही यंत्रणा तालुक्यात नसल्याने हे दूध फेकून देण्याची व पर्यायाने दूध व्यावसायिक यांना देशोधडीला लावणारे असल्याचे त्यांनी सांगितले .
            
 
             ठाणे कल्याण शहरी भागात डेअरीचे पश्चराईज्ड दूधा सह गोकुळ वारणा महानंदा अमोल हे पॅकिंग दूध  वितरित होते ,ते साठविण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा असते परंतु भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात म्हशींचे ताजे दूध वितरीत होत असते ,जे रोजच्या रोज शहरात येत असते परंतु पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवीत सायंकाळच्या दूध वितरणावर बंदी घातल्याने हे सर्व दूध नसण्याची व त्यामुळे मोठया आर्थिक संकटाला दूध उत्पादकास सामोरे जावे लागत आहे अशी माहिती भिवंडी दूध उत्पादक व विक्रेते महासंघाचे अध्यक्ष आनंद गद्रे यांनी दिली आहे .


            म्हशींचे दूध वेळच्यावेळी न काढल्यास म्हशी च्या
स्तनासह  कासेत मस्ट राईज हा रोग होण्याचा धोका संभवतो तर दुधाळ म्हशींचे दूध न काढल्यास त्यांना ताप येऊन त्या दगाऊ शकतात अशी भिती व्यक्त केली असून दारू वाईन शॉप सह बार बाहेर ऑनलाईन मिळू शकते तर पिशवीत विक्री केल्या जाणाऱ्या दुधास ही पोलीस यंत्रणेने अडवू नये,सध्या रमजान महिना असल्याने दुधाला सायंकाळी ही मागणी असल्याने नाशवंत दूध सायंकाळी 5 ते 7 या वेळेत वितरण साठी परवानगी द्यावी अशी मागणी आनंद गद्रे यांनी पालिका आयुक्त व पोलीस उपायुक्त यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे .
नाशवंत दूध विक्रीस भिवंडीत सायंकाळी मनाई नाशवंत दूध विक्रीस भिवंडीत सायंकाळी मनाई Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads