Header AD

कल्याण पूर्वेत मुस्लीम समाजासाठी दफन भूमीची व्यवस्था करण्याची कॉंग्रेसची मागणी


■कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांचे आयुक्तांना पत्र....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना महामारीमुळे मृत्यूच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे कल्याण पूर्वेत मुस्लिम समाजाच्या नागरिकांसाठी दफनभूमीची व्यवस्था करण्याची मागणी कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.


कल्याण पूर्वेत मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे नागरिक राहतात. तसेच कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी बायपास रस्त्याची निर्मिती करतांना हजारोंच्या संख्येने नागरिक बाधित झाले. त्यात ९९% मुस्लिम समाजाचे नागरिक आहेत. त्यांचे पुनर्वसन कल्याण पूर्वकचोरे येथील बि.एस.यू.पी. योजनेत करण्यात आले. परंतु लाखोंच्या संख्येने लोकवस्ती असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या नागरिकांच्या अंत्यविधीसाठी कल्याण पूर्वेत एकही दफनभूमी नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्याकरिता ४ किलोमीटर चालत कल्याण पश्चिमेला जावे लागते.


कोरोना महामारीमुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. परंतु कल्याण पूर्वेत एकही दफनभूमी नसल्याने अंत्यविधी अजूनही कल्याण पश्चिमेलाच करावा लागतो. ही बाब सध्याच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर व सोशल डिस्टनसिंगच्या दृष्टीकोनातूनाही जीवघेणी आहे.


मुस्लिम दफनभूमी बाबतची दखल यापूर्वीही घेतली गेली होती व त्याअनुषंगाने दिनांक २४/१२/२०१४ रोजीकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेने मुस्लिम दफनभूमीच्या जागेकरिता ठराव पारित केला. त्याअनुषंगाने सभेचा विषय क्रमांक : ०७ च्या ठराव क्रमांक : ५८ या ठरावानुसार आरक्षण क्र. : ५०५ उद्यानक्षेत्र ,७८,८०० चौ. मि.सर्व्हे नं. २९ पैकी (गट नं. ३८) नवीन गोविंदवाडी (जय भारतनगर) येथील बी.एस.यू.पी. च्या शेजारी एम.आय.डी.सी. च्या पाईपलाईनच्या बाजूला मुख्य रस्त्यावर असलेल्या सुलभ शौचालयाच्या मागे वन जमिनीतील ५००० चौ. मी. क्षेत्राची जागा दफनभूमीसाठी आरक्षित करण्याचा ठराव महासभेने केला होता. परंतु ठराव मंजूर होऊन तसेच अनेक वर्षे उलटूनही दफनभूमीशी संबंधित प्रशासकिय यंत्रणेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ठराव होऊनही मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न आजपर्यंत मार्गी लागलेला नाही.


दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मुस्लिम जनसंख्येमुळे व सध्या असलेल्या कोरोना महामारीसारख्या जीवघेण्या विषयामुळे आणखीनच गंभीर होत आहे. त्यामुळे मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी केली आहे.


कल्याण पूर्वेत मुस्लीम समाजासाठी दफन भूमीची व्यवस्था करण्याची कॉंग्रेसची मागणी कल्याण पूर्वेत मुस्लीम समाजासाठी दफन भूमीची व्यवस्था करण्याची कॉंग्रेसची मागणी Reviewed by News1 Marathi on April 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads