Header AD

ठाणे ग्रामीण भागातील कोविड केंद्राची क्षमता वाढवण्याच्या मार्गातील सर्व अडचणी दूर


■रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे ऑक्सिजन, औषध, मनुष्यबळ आशा सगळ्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने निघाला तोडगा....


सवाद कोविड केंद्र पूर्ण क्षमतेने तर वज्रेश्वरी, मिनार कोविड केंद्र सुरू करण्याला प्राधान्य.....


ठाणे ,  प्रतिनिधी  : -  ठाणे ग्रामीण क्षेत्रातील कोविड केंद्रांना भेडसावणारे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे भिवंडी नजीकच्या सवाद येथील कोविड केंद्राची क्षमता वाढवण्यासह, वज्रेश्वरी आणि मिनार येथील कोविड केंद्रही लवकरात लवकर सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


सवाद येथील 800 बेडसचे कोविड केंद्र ऑक्सिजन पुरवठ्या अभावी पूर्ण क्षमतेने सूरु करण्यात अडचण निर्माण होत होती. त्याबाबत डोवली येथील जीसडब्लू कंपनीच्या मदतीने येथे एक दिवसाआड होणारा ऑक्सिजन पुरवठा नियमित करण्याचे निर्देश श्री. शिंदे दिले. याशिवाय या कोविड केंद्रात काम करण्याच्या कर्मचाऱ्यांची तिथेच जवळ राहण्याची सोय करून दिली जेणेकरून त्याची सेवा वेळच्या वेळी मिळू शकणार आहे. याचसोबत त्याना लागणारी सर्व औषध वेळच्या वेळी मिळावी यासाठी पुरवठा करताना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्यात. ऑक्सिजनचा पुरवठा नियमित झाल्यास आजमितीस 208 पेशंट्सना सेवा देणाऱ्या या कोविड केंद्राची क्षमता दुप्पट करता येईल. तसच इथे उभ्या होत असलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट मधून अतिरिक्त ऑक्सिजन मिळाल्यास हे कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करता येणं शक्य होईल. रुग्णांना दाखल करण्यावरून होत असलेले वाद टाळण्यासाठी ठाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ठाणे सिव्हिल रुग्णालयाला प्रत्येकी 3-3 कर्मचारी देऊन त्यांच्यामार्फत रुग्ण दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.  


याचसोबत वज्रेश्वरी आणि मिनार येथील कोविड केंद्र देखील ऑक्सिजन पुरवठ्या अभावी सूरु करण्यात अडचणी येत होत्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक आमदार शांताराम मोरे याना आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करून ही कोविड केंद्र सूरु करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. याशिवाय या भागातील डॉक्टर आणि आणि वैद्यकीय कर्मचाऱ्याची मदत घेता येईल का याची चाचपणी करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

ठाणे ग्रामीण भागातील कोविड केंद्राची क्षमता वाढवण्याच्या मार्गातील सर्व अडचणी दूर ठाणे ग्रामीण भागातील कोविड केंद्राची क्षमता वाढवण्याच्या मार्गातील सर्व अडचणी दूर Reviewed by News1 Marathi on April 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads