Header AD

घरकाम करणारे आणि इतर कामे करणाऱ्या ६१ कर्मचाऱ्यांची केली कोरोना चाचणी

 

■कल्याण मधील रोझाली - एल एक्स सोसायटीचा पुढाकार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सोसायटी, बिल्डींग आदींमध्ये घरकाम करणारे आणि इतर कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. पालिकेच्या या नियमाची अमलबजावणी कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरात असणाऱ्या रोझाली - एल एक्स सोसायटीने करत घरकाम करणारे आणि इतर कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे.


       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार रोझाली - एल एक्स कॉ. ऑ. हाउसिंग सोसायटी लि. मध्ये अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर  टेस्ट करण्यात आली.  यामध्ये सोसायटीमधील घरकाम करणाऱ्या कर्मचारीगाडी धुणारे,  ड्रायव्हरसुरक्षा रक्षकहाऊस कीपिंगगार्डनर अशा सर्व ६१ कर्मचाऱ्यांचे टेस्टिंग महापालिकेतर्फे मोफत करण्यात आले. ६१ कर्मचाऱ्यांपैकी ५० जणांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्या सर्व निगेटिव्ह आल्या आहेत. तर ११ आरटीपीसीआर टेस्ट केल्या असून त्यांचा रिपोर्ट दिवसांत येणार आहे.


या सोसायटीमध्ये एकूण १८६ फ्लॅट असून यामध्ये ७५० ते ८०० नागरिक राहतात. कोरोना प्रादुर्भावापासून बचावासाठी सर्वोतोपरी उपाययोजना आणि खबरदारी सोसायटीच्या वतीने घेण्यात येत आहे. सोसायटीमधील नागरिकांप्रमाणेच येथे काम करणारे कर्मचारी देखील आमच्याच कुटुंबाचा भाग असल्याचे समजून त्यांच्या सुरक्षिततेसाठी या चाचण्या करण्यात आल्या आहेत.  या चाचण्या करण्यासाठी चिकणघर आरोग्य अधिकारी सीमा जाधव यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती रोझाली-एल एक्स सोसायटीचे सेक्रेटरी सुनिल घेगडे यांनी दिली.

घरकाम करणारे आणि इतर कामे करणाऱ्या ६१ कर्मचाऱ्यांची केली कोरोना चाचणी घरकाम करणारे आणि इतर कामे करणाऱ्या ६१ कर्मचाऱ्यांची केली कोरोना चाचणी Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads