Header AD

पट्टेरी वाघाची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चार इसमांना अटक कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीसांनी
कल्याण , कुणाल म्हात्रे  : पट्टेरी वाघाची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चार इसमांना अटक करण्यात  कोनगाव पोलीस ठाण्याच्या पोलीसांना यश आले आहे. मंगळवारी कोनगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत नाशिकमुंबई बायपास हायवे रोडबासूरी हॉटेलच्या समोरठाकुरपाडा याठिकाणी पट्टी वाघाचे कातडे आणि पंजा विकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती मिळाली.         त्याअनुषंगाने कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षकअभिजीत पाटीलतपास पथकातील अंमलदार यांनी वन विभागाचे कर्मचारी व वॉर रेस्क्यु फाऊन्डेशन चे वन्यजिव अभ्यासक सुहास पवार व योगेश कांबळे यांच्यासह सापळा रघुन चार इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन मुद्देमाल हस्तगत केला आहे.

      
        
            याप्रकरणी प्रशांत सुशिलकुमार सिंग (२१) रा. वडाळा,चेतन मंजे गौडा (२३) वडाळाआर्यन मिलींद कदम (२३) वडाळा, अनिकेत अच्युत कदम (२५) सायन कोळीवाडा या चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पट्टेरी वाघाचे कातडे,  पंजा८ लाख किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची ब्रिझा कार,  ५० हजार रुपये किंमतीची काळया रंगाची मारुती सुझुकी कंपनीची एक्सेस १२५ मोटार सायकल, हस्तगत केली आहे.
पट्टेरी वाघाची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चार इसमांना अटक कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीसांनी पट्टेरी वाघाची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चार इसमांना अटक कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीसांनी Reviewed by News1 Marathi on April 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads