Header AD

तर कॅटरर्स व्यावसायिक देखील आत्महत्या करतील नियमांमध्ये शिथिलता आणण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : गेल्यावर्षीपासून लॉकडाऊनमुळे कॅटरिंग, डेकोरेटर, मंगल कार्यलये बंद असल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये लग्नसमारंभात फक्त ५० जणांनाच परवागी असल्याने याचा फटका या व्यावसायिकांना बसणार असून बँकेचे हफ्ते, लाईट बिल, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न आमच्या समोर असल्याने या नियमांमध्ये शिथिलता न आणल्यास कॅटरर्स व्यावसायिकांना देखील आत्महत्या करावी लागेल अशी भीती कल्याणमधील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली कॅटरर्स, डेकोरेशन, हॉल असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली या बैठकीत ते बोलत होते.        


       कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमात फक्त ५० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. याचा फटका कॅटरर्स, डेकोरेशन, मंगल कार्यलये यांना बसला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कल्याण पश्चिमेतील नक्षत्र हॉल येथे या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याबैठकीत कॅटरर्स, डेकोरेशन, हॉल आदींना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती केवळ ५० माणसांच्या ऐवजी प्रत्येक हॉल अथवा लॉन्सच्या ५० टक्के क्षमतेस परवानगी देण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करण्याचे ठरले आहे. यावेळी संतोष देशपांडे, अरुण चव्हाण, नरेंद्र पुरोहित, अभिजित बोले आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


       कॅटरिंग व्यवसाय हा छोटा व्यवसाय नसून, माणसाचा जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत याच्याशी संबंध येत असतो. गेल्या वर्षभरापासून लग्न सराई बंद आहे. यावर्षभरात जेवण बनविणाऱ्यांपासून, भांडी घासणारे, पोळी बनविणाऱ्या महिला हे सर्वच घरी बसले आहेत. या सर्वाना खायचं काय हा प्रश्न भेडसावत आहे. हॉलचं लाखो रुपये भाडं भरायचं कुठून, एप्रिल मे महिन्याच्या लग्नाच्या सीजनच्या आशेवर या व्यवसायाशी निगडीत बसलेले असतात. केवळ लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशीच हॉल उघडत असल्याने ज्याप्रमाणे रिक्षा आणि इतर वाहनांना क्षमतेच्या ५० टक्के वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे आम्हाला देखील हॉल, लॉन्सच्या क्षमतेच्या ५० टक्के माणसांना समारंभांसाठी परवानगी देण्याची मागणी संतोष देशपांडे यांनी केली आहे.


       तर वर्षभर आम्ही केडीएमसीला मालमत्ता कर, पाणी कर, महावितरणला वीजबिल, जागेचे भाडे भरत आहोत. आमच्याकडे असलेल्या कामगारांना पगार देत आहोत.  त्यामुळे आम्हाला कामच नसेल तर हे सर्व कुठून भरणार. शिवाय बँकेचे हफ्ते देखील भरायचे असल्याने आम्हाला उत्पन्नच नसेल तर हे सर्व भरणार कुठून हा प्रश्न आमच्यासमोर असून यावंर लवकर तोडगा न निघाल्यास कर्जबाजारी झाल्याने कॅटरर्स व्यावसायिकांना देखील आत्महत्या करतील अशी प्रतिक्रिया अभिजित बोले यांनी दिली.


       ५० माणसांचे निर्बंध हे चुकीचे असून या नियमामुळे व्यावसायिक उध्वस्त होत असून वर्षभरातून आमचे केवळ ३० ते ३५ मुहूर्तच असतात त्यामुळे या मुहूर्ताच्या दिवशी हॉलच्या क्षमतेच्या ५० टक्के परवानगी द्यावी असे मत नरेंद्र पुरोहित यांनी व्यक्त केले. तर कल्याण डोंबिवलीतील मंडप डेकोरेटर यांचे काम बंद असल्याने मजुरांना पगार कसा द्यायचा तसेच इतर खर्च कसा भागवायचा असा सवाल अरुण चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.     

तर कॅटरर्स व्यावसायिक देखील आत्महत्या करतील नियमांमध्ये शिथिलता आणण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी तर कॅटरर्स व्यावसायिक देखील आत्महत्या करतील नियमांमध्ये शिथिलता आणण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी Reviewed by News1 Marathi on April 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads