Header AD

११मे "महात्मा दिन" साजरा करण्यात यावा - जिल्हा अध्यक्ष विनोद शेलकर■श्री संत सावता माळी युवक संघमहाराष्ट्र राज्यच्या वतीने आवाहन....
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ११ मे १८८८ रोज़ी ज्योतीबा फुलेंना "महात्मा" ही पदवी लोकांनी बहाल केली होती. यंदा कोरोना पादुर्भाव लक्षात घेता शासकीय नियमांचे पालन करून ११ मे "महात्मा दिन" साजरा करण्याचे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व फुलेप्रेमींना करण्यात आले आहे.

 

   दलित आणी निराधारांना न्याय मिळावा या करीता ज्योतीबांनी सत्यशोधक समाजचीं स्थापना केली. त्यांची समाजसेवा पाहुन ११ मे १८८८ रोज़ी मुंबई येथे एका विशाल सभेत लाखोंच्या उपस्थितीत त्याना "महात्मा" ही पदवी बहाल करण्यात आली. ज्योतीबा फुले यांना त्यांनतरच "महात्मा ज्योतीबा फुले" या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले . 


'महात्मा' ही पदवी लोकांकडुन, जनतेकडुन प्राप्त करनारे संम्पुर्ण जगात "महात्मा फुले" हे पहीले समाजसुधारक आहेत. म्हणुनच "महात्मा दिनास" महत्व आले आहे. त्यामुळे महात्मा दिन सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड व प्रदेश अध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन यांनी केले आहे.

   

             शिवजयंतीचे जनकतसेच आंबेडकरांचे गुरु हे महात्मा फुले आहेत. त्यामुळेच शिवजयंतीआंबेडकर जयंतीमहात्मा फुले जयंतीप्रमाणेच "महात्मा दिन" साजरा केला जावायाकरीता श्री संत सावता माळी युवक संघमहाराष्ट्र राज्य ही संघटना २०१६ पासुन प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी ११ मे रोज़ी महाराष्ट्रातील सुमारे १८ जिल्ह्यांत "महात्मा दिन" साजरा केला गेला. 


           त्यानिमित्ताने महात्मा फुलेंना अभिवादन करण्या बरोबरच त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांचे वाटप रक्तदान नेत्रतपासनीमोफत मोतींबींदु परेशन,  आरोग्य शिबीरे,विधवा महीलांना साड्यावाटपपाणपोई उद्घाटनआदी कार्यक्रमांबरोबरच जिल्हाधिकारीतहसीलदार  यांना महात्मा दिन प्रशासकीय स्तरावर साजरा व्हावायाकरीता सर्व जिल्ह्यात निवेदन देण्यात आले होते. 


यासाठी शासन दरबारी सुद्धा प्रयत्न चालु आहेत. यावर्षीसुद्धा सर्व फुलेप्रेमींनीसर्व सामाजिकराजकीय संघटनांनी शासकीय नियमांचे पालन करून महात्मा दिन साजरा करावा असे आवाहन  श्री संत सावता माळी युवक संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद शेलकर यांनी केले आहे.

११मे "महात्मा दिन" साजरा करण्यात यावा - जिल्हा अध्यक्ष विनोद शेलकर ११मे "महात्मा दिन" साजरा करण्यात यावा  - जिल्हा अध्यक्ष विनोद शेलकर Reviewed by News1 Marathi on April 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads