Header AD

दहा हजारां पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ.उदय कुमार कानडे यांचा सन्मान
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना संकटात जे रुग्णांचे जीव वाचवत आहे अश्या डॉक्टरांचे जगभरात कौतुक होत आहे.डोंबिवलीसारख्या शहरात कोरोना रुग्णांची सेवा व उपचार करणारे डॉ.उदयकुमार कानडे यांनी २०२० सालापासून दहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले.डोंबिवली पश्चिमेकडील चिंचोड्याचा पाडा येथील  डॉ. कानडे यांच्या रुग्णसेवेबद्दल एडवोकेट प्रदीप बावस्‍कर ,संतोष बावस्कर आणि समाजसेवक हिम्मत मात्रे यांनी त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
      

            डॉक्टर कानडे यांची एडवोकेट प्रदीप बावस्कर आणि समाजसेवक हिम्मत म्हात्रे यांनी भेट घेतली.यावेळी डॉ.कानडे त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले सांगितले.कोरोनासारख्या आजाराला घाबरण्याचे काही कारण नाही, जर वेळेत आणि सुरुवातीसच तुम्ही या आजाराकडे लक्ष दिल्यास आणि डॉक्टरांचे योग्य ते मार्गदर्शन आणि दवा उपचार घेतल्यास तुम्ही घरच्या घरी बरे होऊ शकतात. योग्य वेळीच औषधोपचार घेतले तर  रेमेडीसिवर सारखे इंजेक्शनची ही गरज लागणार नाही. 


            अशाप्रकारे आज पर्यंत डॉक्टर कानडे यांनी दहा हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त पीडितांना त्यांच्या क्लिनिक मध्येच उपचार करून  रुग्ण व्यवस्थित आहेत.डॉक्टर कानडे यांनी गेल्या वर्षभरात एकदाही त्यांचे डिस्पेंसरी  बंद न ठेवता  कार्यरत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दल  एडवोकेट प्रदीप बावस्‍कर ,संतोष बावस्कर आणि समाजसेवक हिम्मत मात्रे यांनी त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
तसेच डॉक्टर कानडे यांनी  जनजागृती साठी मार्गदर्शनत्मक व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केलेले आहे.
दहा हजारां पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ.उदय कुमार कानडे यांचा सन्मान दहा हजारां पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ.उदय कुमार कानडे यांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on April 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads