Header AD

नियमांचे उल्लंघन करणारी १७ दुकाने पालिकेने केली सील

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करणारी १७ दुकाने पालिकेने कारवाई करत सील केली आहेत.  


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी आपापल्या प्रभागात परिस्थितीची पाहणी केली.


 ब प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ६ दुकाने सील करण्यात आली. क प्रभागात २ मॅरेज लॉन्स ३० एप्रिल पर्यंत सील करण्यात आली. फ प्रभागात मानपाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे व टेलरचे दुकान अशी २ दुकाने तसेच ९० फुटी रोडवरील ३ दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. ग प्रभागात सत्यम सोशल क्लब व २ दुकाने सील करण्यात आली. त्याचप्रमाणे ई प्रभाग क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ई प्रभागातील डी-मार्ट तसेच २ वाईन शॉप सील करण्याची धडक कारवाई केली.


 कोरोना साथीच्या  प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका यंत्रणा अथक काम करीत असताना या कामात महापालिकेच्या नागरिकांनी देखील कोरोना नियमावलीचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावेअसे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करणारी १७ दुकाने पालिकेने केली सील नियमांचे उल्लंघन करणारी १७ दुकाने पालिकेने केली सील Reviewed by News1 Marathi on April 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads