Header AD

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्रिकुटाच्या बाजारपेठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  प्रतिबंधित अंमली पदार्थ विकीकरिता बाळगणाऱ्या त्रिकुटाच्या कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींकडून ५४ ग्राम वजनाचे ८१ हजार किमतीची एम.डी.पावडर जप्त केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.


मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे व.पो.नि यशवंत चव्हाण यांना त्यांच्या  गुप्त बातमीदारा मार्फत कल्याण पश्चिमेतील भोईवाडाएम.एस.ई.बी. ऑफिस जवळ एम.डी.पावडर (मेफेड्रॉन) नावाच्या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचला. ७ एप्रिलला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक ऑटो रिक्षा बैल बजार चौकाकडुन मुर्गी मोहल्ला कडे जाणार रोडने येतांना दिसली. हि रिक्षा एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर आल्यावर या रिक्षातुन तीन इसम खाली उतरले. त्यावेळी बातमीदाराने या तीन इसमांना पाहुन पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे इशारा करून हेच ते एम. डी.पावडर नावाचा अंमली पदार्थ विकी करण्यासाठी येणारे इसम असल्याचे सांगितले.


 त्याप्रमाणे लगेचच या तिघांना जागीच घेराव घालून रात्री अडीच वाजता ताब्यात घेण्यात आले. मेहदी मनवर मजिद (२४) वर्षेइस्माईल उर्फ बोरी अब्बास गाडीवाला (३५), शहबाज गुलाम मुस्तफा शेख (२९) वर्षेअशी त्यांची नावं असुनत्यांच्या पैकी इस्माईल उर्फ बोरी अब्बास गाडीवाला याच्याकडून २७ हजार किंमतीचे १८ ग्रॅम व मेहदी मनवर मजिद याच्या ताब्यातून ५४ हजार किंमतीचे ३६ ग्रॅम वजनाची  असा एकुण ८१ हजार रुपये किंमतीची ५४ ग्रॅम वजनाची एम.डी.पावडर (मेफेड्रॉन) नावाचे अंमली पदार्थ मिळून आले आहेत. तर आरोपी शहबाज गुलाम मुस्तफा शेख यांच्या ताब्यातून एक ऑटो रिक्षा३ मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १ लाख ४९ हजार ३७० रुपये  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


हि कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी स.पो.नि. प्रमोद सानपपोहवा. टी के पावशेयु. व्ही. सावत, पोना. बी.आर. बागुलपोना. जी एन पोटेपी.एम. बाविस्करपोकॉ  राजाराम सांगळे यांनी केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्रिकुटाच्या बाजारपेठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्रिकुटाच्या बाजारपेठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या Reviewed by News1 Marathi on April 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads