Header AD

मॅनकाइंड फार्माचे व्यक्तिगत स्वच्छता विभागात पदार्पण
■‘सेफकाइंड टॉयलेट सीट स्प्रे’ बाजारपेठेत दाखल ~


मुंबई, २७ एप्रिल २०२१ : भारतातील आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक मॅनकाइंड फार्माने देशाला निरोगी बनवण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे. भारत देश स्वच्छ, सुरक्षित व निरोगी बनावा यासाठी पुढाकार घेत मॅनकाइंड फार्माने ‘सेफकाइंड टॉयलेट सीट डिसइन्फेक्टंट स्प्रे’ बाजारपेठेत दाखल केला आहे. अस्वच्छ शौचालय, खास करून सार्वजनिक शौचालय वापरावे लागल्यास तेथील अस्वच्छतेपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी 'सेफकाइंड टॉयलेट सीट डिसइन्फेक्टंट स्प्रे' अतिशय उपयोगी व वापरायला खूपच सोपा आहे.

गेल्या वर्षी मॅनकाइंड फार्माने सेफकाइंड हा आपला नवा ब्रँड सुरु केला. स्वच्छता आणि आरोग्यासाठी सुरु असलेल्या लढाईमध्ये देशाचे बळ वाढवण्यासाठी एखाद्या शूर योद्ध्याप्रमाणे सेफकाइंड ब्रँडने एन९५ मास्क्स आणि हॅन्ड सॅनीटायझर्स ही दोन अतिशय प्रभावी उत्पादने दाखल केली. हे नवे उत्पादन आता या ब्रँडमध्ये आणण्यात आले आहे. हे मुख्यत्वेकरून स्त्रियांसाठी तयार करण्यात आले आहे.मूत्रमार्गातील संसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) ही स्त्रियांच्या बाबतीत गंभीर बनत चाललेली समस्या टाळली जावी या उद्देशाने सेफकाइंड टॉयलेट सीट डिसइन्फेक्टंट स्प्रे तयार करण्यात आला आहे. बहुतांश सार्वजनिक शौचालये अस्वच्छ असल्यामुळे त्यांचा वापर करण्याची वेळ आली तर या समस्येचा धोका खूप जास्त वाढतो. सेफकाइंड टॉयलेट सीट डिसइन्फेक्टंट स्प्रे उपलब्ध असल्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल व सार्वजनिक शौचालयांचा वापर देखील सुरक्षित पद्धतीने करता येईल. या उत्पादनामध्ये आयपीए (इसोप्रोपिल अल्कोहोल - १०% डब्ल्यू/डब्ल्यू), बीकेसी (बेन्झलकोनियम क्लोराईड) आहे जे ९९.९% जंतू मारते व स्वच्छ, जंतुविरहित शौचालयाचा वापर केल्याचा ताजातवाना करणारा अनुभव मिळतो.


मॅनकाइंड फार्माचे सेल्स व मार्केटींगचे मुख्य व्यवस्थापक श्री. जॉय चॅटर्जी यांनी सांगितले, 'आज जेव्हा संपूर्ण जग आरोग्यावर ओढवलेल्या आणीबाणीचा सामना करत आहे आणि सर्व जागा सॅनीटाईझ करून स्वच्छ ठेवण्याची निकड आहे, अशावेळी सेफकाइंड ब्रँडमध्ये हे नवे उत्पादन घेऊन येताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महिलांच्या बाबतीत उद्भवणाऱ्या शरीराच्या स्वच्छतेशी संबंधित आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या समस्यांचे वाढते प्रमाण डोळ्यासमोर ठेवून आम्ही आपल्या समाजाला संरक्षण पुरवून देशसेवेसाठी हे पुढचे पाऊल उचलले आहे.'


मन ताजेतवाने करणारा, मोहक सुगंध असलेल्या सेफकाइंड टॉयलेट सीट डिसइन्फेक्टंट स्प्रेच्या ७५ मिली बाटलीची किंमत २०० रुपये आहे. प्रवासात ही बाटली आपल्यासोबत ठेवणे अगदी सहज व सोयीस्कर आहे.

मॅनकाइंड फार्माचे व्यक्तिगत स्वच्छता विभागात पदार्पण मॅनकाइंड फार्माचे व्यक्तिगत स्वच्छता विभागात पदार्पण Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads