Header AD

ब्रह्मांड कट्टा व दि बुध्दिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महामानवास मानवंदना !
ठाणे , प्रतिनिधी  ;   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. परंतु ब्रह्मांड कट्टयाने मनामनावर अधिराज्य करणार्‍या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला मानवंदना देण्यापासुन जनतेला वंचित ठेवले नाही. नियमांचे सर्वतोपरी पालन करीत परमपूज्य महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त *महामानवास मानवंदना* हा खास भीम गीतांचा ऑनलाईन कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला होता.              गायक सावन कुमार सुपे, गायिका तन्वी हुलावले यांनी रोमारोमात चैतन्य भरणारी श्रवणीय भीम गीते सादर केली. माहितीपर, आवेशपूर्ण तर कधी ह्रृदयस्पर्शी अशा विविधरंगी भीम गीतांनी वातावरण डॉ.आंबेडकरांच्या महतीने भरुन गेले. 'दलिताचा राजा भीमराव माझा', 'भीमराज की बेटी हू',  'छाती ठोक हे सांगू जगाला' या व अशा अनेक गीतांनी सर्व रसिकश्रोते या युगपुरुषाच्या स्तुतीसुमनांमध्ये रममाण झाले. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा अंकुशकुमार यांनी लिलया पेलली. आपल्या शब्दसामर्थ्याने त्यांनी हा कार्यक्रम श्रवणीयच नव्हे तर प्रेरणादायी बनविला.  अंकुशकुमार यांनी अत्यंत प्रभावशाली भाषेत डाॅ. बाबासाहेबांची महती विषद केली व कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.                 गेले वर्षभर लाॅकडाऊन असल्याने कोणतेही कार्यक्रम करण्यास कलाकारांना वाव नाही. कलेवर पोट असणारे कलाकार हालअपेष्टा व बिकट परिस्थितीला तोंड देत आहेत. निवेदक अंकुशकुमार यांनी ही विदारक स्थिती मायबाप प्रेक्षकांसमोर मांडली व मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत दि बुध्दिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सचिव अनिल आठवले यांनी अंकुश कुमार यांना मदतीचा धनादेश  सुपूर्त  केला. 


       
              त्याचवेळी  ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी देखील माणुसकीचे दर्शन घडवित भरघोस मदत सुपूर्त केली व अशा प्रसंगी खंबीरपणे कलाकारांच्या पाठीशी उभे रहाण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी कट्ट्याचे अध्यक्ष महेश जोशी हे उपस्थित होते. दि बुध्दिस्ट वेलफेअर असोसिएशन चे सचिव अनिल आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले. अशाप्रकारे सर्वांचे प्रेरणास्थान असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुरमयी आदरांजली देत नगरिकांनी जयंती घरबसल्या परंतु जल्लोषात साजरी केली.
ब्रह्मांड कट्टा व दि बुध्दिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महामानवास मानवंदना ! ब्रह्मांड कट्टा व दि बुध्दिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महामानवास मानवंदना ! Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads