Header AD

ठामपाच्या तिन्ही कोविड सेंटर मध्ये मनुष्य बळाची कमतरता ओम साई कडून समझौता कराराचा भंग - शानू पठाण
ठाणे (प्रतिनिधी)-  कोरोनाचा कहर वाढल्यानंतर ठाणे महानगर पालिकेने तातडीने उपाययोजना करून तीन कोविड सेंटर उभारले. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या तिन्ही कोविड सेंटरचा कारभार चालविण्यासाठी ओम साई या कंपनीसोबत समझौता करार करण्यात आला. मात्र, या कंपनीने कराराचा भंग केला आहे. जेवढे मनुष्यबळ रुग्णालयांना देणे क्रमप्राप्त होते.


 तेवढे पुरविण्यात आले नाही. त्यामुळे ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास या ठिकाणी रूग्णांना व्यवस्थित सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यातून जर रुग्णांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी ओमसाई किंवा प्रशासन घेईल का? , असा सवाल विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी विचारला आहे. दरम्यान या कोविड सेंटरमधील अनागोंदी कारभार पाहण्यासाठी आपण सोमवारपासून दौरे करणार आहोत, असेही पठाण यांनी सांगितले. 


कोरोनाची पहिली लाट आली त्याचवेळेस ठामपाने ग्लोबल रूग्णालय सुरू केले. त्यानंतर व्होल्टास आणि पार्किंग प्लाझा येथील रूग्णालये प्रस्तावित करून हे तिन्ही कोविड सेंटर जनतेच्या सेवेत रुजू करण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या यंत्रणा त्यामध्ये विकसीत करण्यात आल्या.या रूग्णालयात कर्मचारी पुरवण्यासाठी ओम साई या कंपनीशी करार करण्यात आला. मात्र, रुग्णांची संख्या बेसुमार वाढत असतानाही ओम साई संस्थेने अपेक्षित कर्मचारी पुरविले नाहीत. परिणामी रूग्णांना अपेक्षित सेवाच मिळत नाही. आजमितीस या तिन्ही सेंटरमधील आयसीयूमध्ये 20 तज्ज्ञ डाॅक्टर, 40 कन्सल्टंट , 500 नर्स आणि 500 वाॅर्डबाॅय यांची कमतरता भासत आहे.


 त्यामुळे 'लागेल तेवढे मनुष्यबळ पुरविण्यात येईल ' , असा करार ओमसाईने ठामपाशी   केला होता. मात्र या कराराचा भंग होत आहे. हा भंग होत असतानाही ठामपा प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात कोविड रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे कर्मचारी संख्येअभावी रूग्णांना उत्तम सेवा मिळत नसेल तर एवढे मोठे रूग्णालय उभारून फायदा काय? उद्या जर कर्मचाऱ्यांअभावी एखादी अप्रिय घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असेल ? असे प्रश्न विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी उपस्थित केले आहेत. 


दरम्यान,  भाईंदर पाडा येथील कोविड सेंटरमधील भोंगळ कारभाराविरुद्ध महासभेत आपण आवाज उठवला होता. त्यावर काही उपाययोजना झाल्या आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी आणि तिन्ही कोविड सेंटरमधील परिस्थिती पाहण्यासाठी सोमवारपासून आपण दौरे करणार असल्याचेही शानू पठाण यांनो सांगितले.

ठामपाच्या तिन्ही कोविड सेंटर मध्ये मनुष्य बळाची कमतरता ओम साई कडून समझौता कराराचा भंग - शानू पठाण ठामपाच्या तिन्ही कोविड सेंटर मध्ये मनुष्य बळाची कमतरता ओम साई कडून समझौता कराराचा भंग - शानू पठाण Reviewed by News1 Marathi on April 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads