Header AD

क्रिएशन इन्व्हेस्ट मेंटची ३ भारतीय कंपन्यांत १२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
■अधिक चांगल्या वित्तीय सेवा मिळण्याकरिता क्रेडअॅव्हेन्यू सोबत भागीदारी ....


मुंबई, १३ एप्रिल २०२१ : विकसनशील बाजारातील वित्तीय सेवांमध्ये भांडवल गुंतवणूक करणाऱ्या आघाडीची खासगी कंपनी, क्रिएशन इन्व्हेस्टमेंट्स कॅपिटल मॅनेजमेंट एलएलसी ने भारतातील तीन गैर-बँक वित्तीय कंपन्यांमध्ये १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कर्ज भांडवल गुंतवणूक केली. विव्रिती कॅपिटलची उपकंपनी असलेल्या क्रेडअॅव्हेन्यूसोबत क्रिएशन्स इन्व्हेस्टमेंटने भागीदारी केली. भारतातील लोकांना वित्तीय सेवांचा लाभ घेण्यास मदत करण्याचा उद्देश, यामागे आहे.


या वर्षाच्या सुरुवातीला क्रिएशनने १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा भारत केंद्रीत कर्ज निधी दिला. उपरोक्त तीन फर्ममधील गुंतवणूक निधी यापैकीच पहिल्या टप्प्यातील आहे. ज्या बिगर बँक कंपन्या कर्जपुरवठा करतात, केवळ त्यांच्यावरच निधीचा भर दिला जाईल. जेणेकरून मायक्रो कर्ज, किफायतशीर घरे, वाहन कर्ज, लघु-मध्यम उद्योग कर्ज (एसएमई) आणि शैक्षणिक वित्त यासारख्या क्षेत्रांना फायदा होईल.


क्रिएशन हे क्रेड अॅव्हेन्यूसोबत भागीदारी करत आहे. ज्यांचे तंत्रज्ञान आधारीत कर्ज प्लॅटफॉर्म कर्जासंबंधी मापदंडाची पूर्तता करणाऱ्या नॉन-बँक फायनान्सना शोधते. या प्लॅटफॉर्मवर ड्यू डिलिगन्स, डील एक्सक्युशन, रिस्क मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॉनिटरींग सोल्युशन्सदेखील उपलब्ध आहेत. विव्रिती कॅपिटल, क्रेडअॅव्हेन्यूची मूळ कंपनी, संस्था, गुंतवणूकदार, लघु उद्योजक व अशा लोकांना जोडते,ज्यांना भारतातील पुरेशा वित्त सेवांचा लाभ मिळत नाही.


क्रिएशन इन्व्हेस्टमेंट्स इंडिया ऑफिसच्या प्रमुख रेमिका अग्रवाल म्हणाल्या, 'आर्थिक पिरॅमिडच्या खालील भागात असलेल्या लोकांचा वित्तीय समावेश करण्यावर आमचा भर आहे. क्रेडअॅव्हेन्यूसोबत काम केल्याने, आम्ही गुंतवणूक प्रोग्रामची प्रगती करण्यासाठी विव्रितीची व्याप्ती, वेग आणि कार्यक्षमता याचा लाभ घेऊ शकतो.'

क्रिएशन इन्व्हेस्ट मेंटची ३ भारतीय कंपन्यांत १२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक क्रिएशन इन्व्हेस्ट मेंटची ३ भारतीय कंपन्यांत १२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads