Header AD

कॅब चालकाला लूटणार्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 कल्याण, कुणाल  म्हात्रे   : कल्याणमध्ये रात्रीच्या सुमारास कॅब चालकाला लूटणार्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या तासाभरात गुन्ह्यांची उकल करीत बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद आदील आयुब शेख आणि मुजाहिद लांजेकर अशी या पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दोघां आरोपीची नावे असून या दोघांनी याआधी अशा प्रकारे किती लोकांची लूट केली आहे याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.


 मुन्वर हुसेन शेख हे अँन्टाँप हिल वडाळा पूर्व परिसरात राहणारे असुन ते कॅब चालक आहेत.  १३ एप्रिलच्या रात्री मुन्वर हुसेन शेख हे एका प्रवाशाला सोडण्यासाठी डोंबिवलीस आले होते. प्रवाशाला सोडून ते कल्याणच्या दिशेने निघाले. पत्री पूल ते गोविंदवाडी बायपास या रस्त्याने जात असताना फानूस ढाब्याच्या शेजारी उभे असलेल्या दोन जणांनी शेख यांची कार थांबिवली. चाकूचा धाक दाखवून शेख यांच्या जवळ असलेली दोन हजारांची रोकड आणि दोन मोबाईल हिसकावून घेतले.


या दोघांना आणखीन पैसे पाहिजे होते. शेख यांना एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी कल्याण स्टेशन कडे जाण्यासाठी दोघा पैकी  एकाने ओला कँब चालविण्यास सुरुवात केली. वल्लीपीर चौकीजवळ पोलीस उभे असलेले शेख यांना दिसल्याने त्यांनी प्रसांगावधन दाखवित तात्काळ हँन्ड ब्रेक ओढले व गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करून मदतीसाठी आरडाओरड केली असता ड्रायव्हर सीटवर बसलेल्या आरोपीने ठोश्या बुक्याने मुनवर शेख यांना गाडीचे खाली उतरून दिले. व गाडी सुरू करुन गाडीसह कल्याण स्टेशनच्या दिशेकडे पोबारा केला.


  या प्रकरणी मुनवर शेख यांच्या तक्रारी वरून वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु करून पो नि. पवारम.सपोनि. कांदळकरसपोनि. घोलपपोउपनिरी. जाधव तसेच डी.बी. स्टाफचे कर्मचारी यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेत गुन्हा घडल्यापासुन १ तासाच्या आत गुन्ह्यांची उकल करीत पोलिसांनी दुर्गाडी किल्ल्याच्या शेजारी असलेल्या जुन्या खाडी पुलाजवळ सापळा रचुन मोहम्मद आदील आयुब शेख वय (२७)वर्षे रा.कल्याण गोविंद वाडी आणि मुजाहिद लांजेकर वय (३०) वर्षे रा.मौलवी कंम्पाऊन्ड कल्याण पश्चिम या दोघा आरोपींना  मुद्देमालासह बेड्या ठोकल्या.


 या दोघांपैकी एकाच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. या दोघांनी मिळून किती लोकांना लूटले आहे त्याचा पोलिस तपास करीत असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

कॅब चालकाला लूटणार्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या कॅब चालकाला लूटणार्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads