Header AD

कल्याणच्या फुल मार्केट मध्ये नागरिकांची गर्दी




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये पालिका प्रशासनाने निर्बंध लावले असतांना आज गुढीपाड्व्याच्या दिवशी या निर्बंधांना नागरिकांनी हरताळ फासल्याचे पाहायला मिळाले.


              कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या फुल मार्केटमध्ये नागरिकांनी फुलांच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी सामजिक अंतर पाळण्याच्या नियमाची पुरती पायमल्ली केली होती. दरवर्षी प्रमाणे यंदा फुलांची आवक कमी जरी असली तरी नागरिकांची गर्दी मात्र मोठी होती. 


                गुढीपाडवा सण साजरा करतांना मात्र नागरिक कोरोनाचे नियम पाळायला पुरते विसरून गेले होते. यामुळे कोरोनाचा जास्त प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कल्याणच्या फुल मार्केट मध्ये नागरिकांची गर्दी  कल्याणच्या फुल मार्केट मध्ये नागरिकांची गर्दी Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads