Header AD

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे पुस्तक आहेअसे गौरवोद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. अग्निशमन दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या आत्मनिवेदनपरभिकू बारस्कर लिखित ध्येयपूर्ती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासमयी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे उद्गार काढले.


गुंड यांनी गावागावात जाऊन होतकरू तरुणांना हे पुस्तक वाचायला द्यावेत्या तरुणांना पाठबळ द्यावे,असेही ते पुढे म्हणाले. पूर असो किंवा दुसरी कोणतीही आपत्ती असोआमचे अग्निशमन अधिकारी कुठे कमी पडले नाहीतअशा शब्दात आयुक्तांनी दिलीप गुंड यांची प्रशंसा केली.


कार्यक्रमाच्या प्रारंभीआपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या अग्निशमन व आणीबाणी सेवेतील जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  मुख्य अग्निशमन अधिकारी गुंड हे खरोखरच आगीशी खेळणारी व्यक्ती असून आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना शहीद दर्जा मिळवून देण्याची मोलाची कामगिरी त्यांनी केली असल्याबाबत कौतुक अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी यावेळी केले.


 या पुस्तक  प्रकाशन सोहळ्यासमयी पालिका सचिव संजय जाधव आणि पुस्तकाचे लेखक भिकू बारस्कर यांची समयोचित भाषणे झाली. फायरमन म्हणून सेवेत लागलेल्या आणि तब्बल ३९ वर्षाचा सेवा कालावधी पार करून अनेक अडचणींना तोंड देऊन आता मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावरून जून महिन्यात निवृत्त होणाऱ्या दिलीप गुंड यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त त्यांच्या कारकीर्दीतील अनेक घटना यावेळी विषद केल्या.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दल हे आता सर्व सुविधांनी ,उच्च दर्जाच्या वाहन सामुग्रीनिशी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले. या कौतुक सोहळ्यात उपस्थित असलेल्या दिलीप गुंड यांच्या मातोश्री सोनाबाई नागनाथ गुंड यांचा सत्कार पालिका आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दत्तात्रय लदवा यांनी केले.

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads