Header AD

कारागृहाची भिंत ओलांडून पळालेला कैदी, चार वर्षांनी पुन्हा पोलिसांच्या ताब्यातकल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याणमधील आधारवाडी  कारागृहाच्या मागील बाजूची मोठी भिंत ओलांडून ४ वर्षांपूर्वी दोन कैदी पळून गेले होते. त्यापैकी एका कैदाला मुंबई गुन्हे कक्ष ४च्या पोलीस अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील उलवे परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांनतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याला कल्याण मधील  खडकपाडा पोलिसांच्या स्वाधीन  केले.  खडकपाडा पोलिसांनी  त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करीत आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. डेव्हिड मुर्गेश देवेंद्रला (२७) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे.


२३ जुलै २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास आधारवडी कारागृहाची मागील  भिंत केबल वायरच्या सहाय्याने ओलांडून डेव्हिड आणि त्याचा साथीदार मनीकंडर नाडर हे दोघे पळून गेले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुढे येताचजेल प्रशासनाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले  होते. तर त्यावेळेचे जेल अधीक्षक यांची तडकाफडकी उचलबांगडी करून चौकशी सुरु केली होती. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जेलमधून पळून गेल्यावर हे दोघे आरोपी कन्याकुमारीला गेले. तेथे ही ते चोरीदरोडेघरफोड्या करू लागले. मात्रतिथे त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर तिथल्या ही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन डेव्हिड पुन्हा महाराष्ट्रात पळून आला. तो नवी मुंबईच्या उलवे परिसरात  नाव आणि वेष बदलून राहून एका पाणी विक्रेत्याकडे काम करू लागला. 


डेव्हिडला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. त्याचा साथीदार नाडरला महात्मा फुले पोलिसांनी २०१६ मध्ये अटक केली होती. या दोघांच्या विरोधात अनेक दरोडेचोरी सारखे  गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांनतर दोघांना  न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती.  जेलमधून पळून जातानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यावेळी  कारागृहातील पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        

             दोघांनी पळून जाण्यासाठी कारागृहातील बंद असलेल्या सीसीटीव्हीची वायर कापली. तिचा दोरीसारखा वापर करून कारागृहाच्या भिंती ओलांडल्या. कारागृहाचे दैनंदिन कामकाज सकाळी सुरू झाले. तेव्हा दोघेही पाच नंबरच्या बराकीत होते. प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करतदोघे बाहेर पडल्याचे काही कैद्यांनी पाहिले होते. ते बराच काळ सापडत नसल्यानेजेल  पोलिसांनी आधी बराकीत शोध घेतला. 


               तोवर त्यांनी भिंतीवरून उड्या मारल्या होत्या. नंतर ते कल्याण खाडीवरील वाडेघर - सरवली जाणाऱ्या लोखंडी पुलावरू कल्याण-भिवंडी मार्गावरील सरवली एमआयडीसीच्या दिशेने पळाले होते.  या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. तो मोबाइवर बोलत होता. त्याचा मोबाइल हिसकावून ते त्याची दुचाकी घेऊन पळ काढण्याच्या बेतात होते.  तेव्हा त्यांच्यात झटापट झाली. त्यात त्यांच्यातील एका कैद्याच्या तोंडाला मार लागला होता.

कारागृहाची भिंत ओलांडून पळालेला कैदी, चार वर्षांनी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात कारागृहाची भिंत ओलांडून पळालेला कैदी, चार वर्षांनी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात   Reviewed by News1 Marathi on April 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads