Header AD

ठाण्यातील हॉटेल कॅपिटल आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित

 ठाणे , प्रतिनिधी  ;  शहरातील कोविड -१९ विषाणूचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना स्वतःच्या खर्चाने खाजगी विलगीकरण कक्षात तपासणी आणि उपचार घेण्याची तयारी असणाऱ्यांकरिता महापालिकेच्यावतीने हॉटेल कॅपिटल हे आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले असून यासाठी प्रतिदिन दर निश्चित करण्यात आला आहे.


        ठाणे महानगरपालिका हद्दीतील कोविड -१९ विषाणूचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षणे नसलेल्या ज्या रुग्णांना महापालिकेच्या हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा खाजगी रुग्णालयामध्ये दाखल व्हायचे नसेल. परंतु विलगीकरण करण्यासाठी स्वत:चे खर्चाने अन्य ठिकाणी राहण्याची तयारी असेल अशा लोकांसाठी ठाणे शहरातील अस्तित्वात असलेल्या हॉटेल्सची रचना कोविड -१९ आयसोलेशन सेंटर म्हणून चार भागात करण्यात आलेली असून त्यासाठी दर निश्चित करण्यात आलेले आहेत.


         ठाण्यातील माजिवडा,घोडबंदर रोड येथील हॉटेल कॅपिटल व्यवस्थापकांनी ठाणे शहरातील कोविड -१९ विषाणू संसर्गाने बाधित झालेल्या व्यक्तींच्या विलगीकरणासाठी हॉटेल देण्याची तयारी दर्शविली आहे.  एकूण २५ खोल्या असलेल्या या हॉटेलमध्ये व्यवस्थापकांनी त्यांचेकडे अनुभवी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचेसह आवश्यक त्या सर्व सोयी - सुविधा उपलब्ध केल्या आहेत.


         ठाणे महापालिकेच्यावतीने सदरचे हॉटेल हे कोविड -१९ विषाणूचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षण नसलेल्या रुग्णांना स्वतःच्या खर्चाने तपासणी आणि उपचार करून घेण्यासाठी आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये  दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिदिन रुपये २,००० इतका दर निश्चित करण्यात आला असून यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण देण्यात येणार आहे.

ठाण्यातील हॉटेल कॅपिटल आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित ठाण्यातील हॉटेल कॅपिटल आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित Reviewed by News1 Marathi on April 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads