Header AD

भोपाळ मधील जबरी चोरीच्या आरोपीला खडक पाडा पोलीसांनी केली अटककल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मध्यप्रदेश येथील भोपाळ मधील एका जबरी चोरीच्या आरोपीला पकडण्यात खडकपाडा पोलीसांना यश आले असून या आरोपीला आज मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.  


कोतवाली पोलीस स्टेशन भोपाळमध्यप्रदेश येथे नोंद असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी जाफर उर्फ चौहाण युसुफ जाफरी रा.इराणीवस्तीआंबिवली कल्याण हा मिळुन येत नसल्याने पोलीस उप महानिरीक्षकरेंज भोपाळ यांनी २२ जून २०२० रोजी भोपाळ पोलीस रेग्युलेशन पैरा ८०(ए) प्रमाणेत्यास पकडुन देणाऱ्यास १० हजार रू. बक्षीस घोषीत केले. त्यानुसार त्यांनी परिमंडळ-३ पोलीस उप आयुक्त,  कल्याण यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.


त्याअनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीसांनी सप्टेंबर २०२० पासुन मोहिम राबवूनअथक प्रयत्न करून ६ एप्रिल रोजी आंबिवली इराणी वस्तीतुन ताब्यात घेवून उल्लेखनीय कामगीरी केली आहे. या आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन भोपाळमध्यप्रदेश यांच्या ताब्यात दिले आहे. हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप. आयुक्त विवके पानसरेसहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवारव.पो.नि. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक योगेश गायकरपो.ह. जितेंद्र ठोकेपो.कॉ. विनोद चन्नेदिपक थोरातअशोक आहेरसुरेश बडे व राजाराम गामणे यांनी केली आहे.


आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये आरोपींना पकडण्यास जाणाऱ्या पोलीसांवर अनेकवेळा हल्ला झालेला असताना देखीलखडकपाडा पोलीसांनी सप्टेंबर २०२० पासुन ते दिनांक ०६ एप्रिल पर्यंत इराणी वस्तीतील चैनस्नॅचरजबरी चोरी, घरफोडीफसवणुक आदी गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपींना पकडुन महाराष्ट्र राज्यातील भिवंडीठाणे ग्रामिणमिरा-भाईदररायगडनाशिक शहरमुंबई शहर येथील एकुण १५ आरोपी पकडुन दिलेले असुन राज्याबाहेरील मध्यप्रदेश-१हरयाणा-२कर्नाटक-१ असे एकणु ४ आरोपींना पकडुन दिले आहे. तसेच वेगवेगळया राज्यातुन येणाऱ्या पोलीस पथकास इराणी आरोपींना पकडण्यास वेळोवेळी शर्थीचे प्रयत्न खडकपाडा पोलीस करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. 


भोपाळ मधील जबरी चोरीच्या आरोपीला खडक पाडा पोलीसांनी केली अटक भोपाळ मधील जबरी चोरीच्या आरोपीला खडक पाडा पोलीसांनी केली अटक  Reviewed by News1 Marathi on April 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads