Header AD

पोलिसांना स्टीमर, सॅनिटाय झर आणि मास्कचे वाटप


■संम्मान वेलफेअर संस्था आणि टीम परिवर्तन यांचा एकत्रित उपक्रम....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : टीम परिवर्तन ही सामाजिक संस्था कोरोनाच्या संकटकाळात सातत्याने गरजु आणि वंचित लोकांना वेळोवेळी अन्नधान्य त्याचबरोबर कपडेमास्कसॅनिटायझ यांचे वाटप करत आहे. नुकतेच संस्थेने संम्मान वेलफेअर संस्था यांच्या मदतीने ताडदेव आणि मलबार हिल पोलिस स्टेशन मधील फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिस बांधवांना स्टीमरसॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले.


या उपक्रमात शोभा बोडकेसंजय जंगलीसंदेश जंगलीसंदीप  जंगलीपंकज वैद्य आणि प्रशांत बर्वे यांनी सहभाग घेतला. टीम परिवर्तन या संस्थेचे सदस्य मुंबईत विविध शहरांत वंचित घटकांसाठी काम करत आहेत त्यांच्या या कामांत अनेक लोकांनी आपले योगदान दिले आहे यापुढे आम्हीं अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मदत पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे संस्थेचे तुषार वारंग यांनी यावेळीं कळवले.


नागरिकांनी आपल्या परिसरात असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वंचित लोकांना आपल्या पध्दतीने मदत करण्याचे त्याचबरोबर शासनाच्या नियम अटी पाळण्याचे आवाहनही त्यांनी यावेळीं केले. संम्मान वेलफेअर संस्थेचे संस्थापक संतोष शाह यांनी उपक्रमासाठी साहित्य उपलब्ध करून दिले.

पोलिसांना स्टीमर, सॅनिटाय झर आणि मास्कचे वाटप  पोलिसांना स्टीमर, सॅनिटाय झर आणि मास्कचे वाटप Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads