Header AD

मुंब्रा प्रभाग समिती मध्ये दलालांचे राज्य जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्रांची ऑनलाईन सेवा ठप्प


संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासणार- ठाणे महानगर पालिका विरोधी पक्षनेते शानू पठाण ....


ठाणे  (प्रतिनिधी)  ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन सेवा केवळ इंटरनेट बंद असल्याने महिनाभर ठप्प आहे. मात्र, हीच प्रमाणपत्रे दलालांकडून तत्काळ दिली जात आहेत. 

     

               त्यामुळे ही सेवा तत्काळ सुरू न केल्यास संबधित अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्ष  नेते अश्रफ शानू पठाण यांनी दिला. दरम्यान, पालिकेच्या ऑनलाईन कारभाराचे धिंडवडे काढणारे पोस्टरही पठाण यांनी प्रभाग समिती कार्यालयात लावले आहेत.


                 एक महिला प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा प्रभाग समितीच्या पायर्‍या झिजवत आहे. सुमारे 1500 रूपये खर्च करून दाखल्यासाठी आलेल्या महिलेला ऑनलाईन सेवा बंद असल्याचे कारण पुढे करून पिटाळून लावले. ही माहिती विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांना मिळताच त्यांनी तत्काळ प्रभाग समिती कार्यालय गाठले. 


             त्यावेळी इंटरनेट बंद असल्याने ऑनलाईन सुविधा बंद असल्याचे पठाण यांना सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या पठाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.  यावेळी त्यांनी " ऑनलाईन सेवेचा अर्थः वापरण्यास सोपे नव्हे अवघड, जलद नव्हे धिमा कारभार,  सुसूत्रता नव्हे तर जटीलता" असा संदेश देणारा फलकही लावला. 


              या संदर्भात पठाण यांनी सांगितले की,  इंटरनेट बंद असूनही संबधित अधिकारी दुरूस्त करण्यात आलेले नाही. या मागे काही दलालांचा फायदा होत असल्याने इंटरनेट सुरू केला जात नाही ना? असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला. 


           जनतेच्या हितासाठी सुरू केलेली ही ऑनलाईन प्रणाली आता बंद ठेवण्यात आली आहे. या संदर्भात आपण पालिका मुख्यालयात आवाज उठवणार तर आहोतच;  शिवाय ही प्रणाली तत्काळ सुरू न केल्यास आपण अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशाराही यावेळी असे सांगितले

मुंब्रा प्रभाग समिती मध्ये दलालांचे राज्य जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्रांची ऑनलाईन सेवा ठप्प मुंब्रा प्रभाग समिती मध्ये दलालांचे राज्य जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्रांची ऑनलाईन सेवा ठप्प Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads