Header AD

कोविड सेंटरच्या १५ व्या मजल्या वरील बाथरूमच्या खिडकीतून दोन कैदी पसार
भिवंडी दि 24 (प्रतिनिधि ) भिवंडी  - कल्याण मार्गावर राजणोली नाका  बायपास येथील  २२ मजली टाटा आमंत्रा कोविड  सेंटरच्या १५ व्या मजल्यावर कोरोना बाधित असलेल्या २ अट्टल कैद्यांवर उपचार सुरु असतानाच या दोन्ही कैद्यांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढत १५ व्या मजल्यावरून बाथरूमच्या पाईपवरून खाली उतरून पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. गाजीदारा जाफरी  (वय, २५) खुर्शीद अब्दुल हमिद शेख (वय ३३) असे फरार झालेल्या अट्टल कैद्यांचे नावे आहेत. 

 

१९ एप्रिलपासून सुरु होते दोघाही कैदयांवर उपचार ... 


            कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली  होती. कोरोना बाधित या सर्व कैद्यांची  उपचारासाठी ठाणे येथील सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातच फरार झालेले गाजीदारा


             जाफरी आणि खुर्शीद या दोघांचाही शिक्षा भोगत असताना  कारागृहात १९ एप्रिलला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या दोघांना उपचारासाठी कल्याण - भिवंडी मार्गावर राजणोली नाका  बायपास येथील  टाटा आमंत्रा कोविड  सेंटरच्या १५ व्या मजल्यावर उपचारासाठी दाखल केले होते. 


            मात्र उपचार सुरु असल्याचा फायदा घेत, ज्या  १५ मजल्यावरच्या  रूममध्ये  उपचार सुरु होते. त्या रूममधील बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून त्यातून बाहेर पडत पाईपवरून खाली येत पळ काढला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या फरार कैदयांचा शोध सुरु केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करीत आहेत.  या पूर्वीही खुनाच्या गुन्हयातील आरोपी झाला होता फरार ..   


          भिवंडी -कल्याण मार्गावर राजणोली नाका  बायपास येथील  टाटा आमंत्रा कोविड  सेंटरमध्ये  कोरोना  पॉझिटिव्ह असलेला  खुनाच्या  गुन्हयातील आरोपी  गर्दीचा फायदा घेऊन फरार झाल्याची घटना जून महिन्यात घडली होती. विशेष म्हणजे या फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला होता.


            बाळू  खरात (वय, ४९ ) असे  फरार होऊन पुन्हा मध्यवर्ती पोलिसांच्या  तावडीत सापडलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बाळूवर त्याच्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. विशेष म्हणजे टाटा आमंत्रा कोविड  सेंटरमध्ये  ठाणे  जिल्ह्यातील ग्रामीणसह भिवंडी, उल्हासनगर , कल्याण - डोंबिवली या तिन्ही महापालिकेच्या  हद्दीतील हजारो रुग्ण येथे उपचार घेत होते. त्यामुळे याठिकाणी दरदिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.  

 

 डॉन बोस्को शाळेमध्येही कैद्यांसाठी विलगीकरण कक्ष ...  

         आधारवाडी कारागृहात एखाद्या कैद्याला थंडी - ताप आल्यास कारागृहातील  विलगीकरण कक्षही बनवण्यात आला असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळे मध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नविन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात आहे. 

कोविड सेंटरच्या १५ व्या मजल्या वरील बाथरूमच्या खिडकीतून दोन कैदी पसार कोविड सेंटरच्या १५ व्या मजल्या वरील बाथरूमच्या खिडकीतून दोन कैदी पसार Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads