Header AD

गाळेगाव परिसरातील स्माशन भुमीच्या बांधकामाची प्रतिक्षा संपणार कधी
कल्याण , कुणाल म्हात्रे   :   गाळेगाव यादव डेअरी फार्म परिसरा नजीक उल्हास नदी किनारी असलेली सार्वजनिक स्मशानभूमी बांधण्याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पन्नास लाख रुपयांची तरतूद करून त्यांची वर्क ऑर्डर देखील ठेकेदाराला देऊ केली आहे. मात्र हि जागा एनआरसी व्यवस्थापनाकडून अदानी समूहाने घेतल्याने आणि ती जागा देण्यास अदानी समूहाने हरकत घेतल्याने तोडक स्मशान भूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करणे कठीण होऊन बसले आहे.मोहने परिसरातील एच एनगाळेगावजेतवन नगरएन आर सी कॉलनीडेअरी फार्मयादव नगर, विकास कॉलनी, महात्मा फुले नगर, लहुजी नगर, कांतीलाल कॉम्प्लेक्सशिवशृष्टी विजयनगर व अन्य रहिवाशांकरिता उल्हास नदी किनारी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेची सार्वजनिक स्मशानभूमी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्मशानभूमीचे अवस्था अत्यंत बिकट झाल्याने पालिकेच्या वतीने तिची वारंवार दुरुस्ती केली जाते. कोरोना महामारीत एकाच दिवशी तीन शव आल्यास एका मृतांच्या नातेवाईकांची दमछाक होताना दिसून येत आहे.दोन ते अडीच महिन्यापूर्वी कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते नवीन स्मशानभूमीचे भूमिपूजन आयोजित केले होते. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने या स्मशानभूमी करिता ५०  लाखाची तरतूद करून ठेकेदाराला वर्कऑर्डर देखील दिली होती. मात्र सदरची नियोजित स्मशानभूमीची जागा ही एनआरसी कंपनीच्या मालकीची असल्याने पालिकेने व्यवस्थापनाकडे २२ गुंठे जागा मागून त्या बदल्यात टीडीआर देण्याचा देखील प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. नियोजित २२ गुंठ्यांत सुसज्ज स्मशानभूमीचा आराखडा तयार केला असून यात बसण्याकरिता स्टेडियमविविध प्रकारची झाडे,फुलेपाण्याच्या टाक्यामृतांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता बर्निंग स्टॅन्ड व अन्य सुविधायुक्त ही स्मशान भूमी बांधण्यात येणार आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे या २२ गुंठयाच्या जागेवर स्मशानभूमी करता आरक्षण टाकले असून त्याचा मोबदला म्हणून पालिका प्रशासन टीडीआर देणार आहे. मात्र अडीच तीन महिन्याचा कालावधी उलटूनही अदानी समूह पालिका प्रशासनाला नियोजित स्मशानभूमीची जागा देण्यास चालढकल करीत आहे.दोन दिवसापूर्वी या स्मशानभूमीत एकूण तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणली होती. एकूण तीन बर्निंग स्टॅन्ड असून एका ठिकाणी बर्निंग स्टँडला स्ट्रक्चर नसून तुटलेल्या स्ट्रक्चर जमा करून कसेबसे बर्निंग स्टॅन्ड मृतदेह ठेवण्याकरिता जुळवून ठेवले. आणि त्यानंतर लाकडे रचून मृताला अग्निडाग देण्यात आला.यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांना विचारणा केली असता अदानी समुहा बरोबर आमचे बोलणे सुरु असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांनादेखील अदानी समूहाकडून ना हरकत दाखला मिळत नसल्याचे सांगत आम्ही याबाबत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर माजी नगरसेविका शीतल गायकवाड, मनसेच्या माजी नगरसेविका सुनंदा कोट यांनी देखील स्मशानभूमी करिता पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले.


गाळेगाव परिसरातील स्माशन भुमीच्या बांधकामाची प्रतिक्षा संपणार कधी गाळेगाव परिसरातील स्माशन भुमीच्या बांधकामाची प्रतिक्षा संपणार कधी Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads