Header AD

कोरोनामुळे नागरीकांना होणाऱ्या गैरनसोयी बाबत राष्ट्रवादीच्या पदा धिकाऱ्याने वेधले आयुक्तांचे लक्ष


नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याची भालचंद्र पाटील यांची मागणी...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे नागरीकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत राष्ट्रवादीचे डोंबिवली विधानसभा माजी कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले असून करदात्या नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.  


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची महानगरपालीका प्रशासनाला कल्पना असून सुद्धा महानगरपालीक हद्दीतील लोकसंख्या पहाता महानगरपालीकेने तयार केलेली यंत्रणा अपूरी पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून महापालीका हद्दीतील कोरोनाग्रस्त रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही उपचारासाठी बेड मिळत नाहीऑक्सिजन मिळत नाहीव्हेन्टिलेटरची सुविधा नाही त्यातच अंत्य संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी मिळत नाही. अशा गंभीर परिस्थीती मध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी कोणतेही सहकार्य करत नाही. अशावेळी सर्व सामान्य नागरीकांनी जायच कुठे असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.


या गैरसोयीतून नागरिकांना वाचविण्यासाठी महानगरपलीकेचे कोरोना मदत कक्ष/संपर्क कक्ष प्रत्येक प्रभाग क्षेत्रात १० ते ६ एवजी चोवीस तास सुरु ठेवावे. कोरोना कालावधीमध्ये मृत्यू पावलेल्या प्रत्येक मृतदेहाचा अंत्यसंस्कार मुंबई महानगरपालीके प्रमाणे मोफत करण्यात यावा. अंत्यसंस्कार करण्यासाठी काही तांत्रीक कारणांमुळे बंद असलेल्या स्मशानभूमी त्वरीत सुरु करुन तेथे मोफत अत्यंसंस्काराची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाग्रस्त रुग्नांणा उपचारासाठी लागणारे इंजेक्शन व औषधे मुबलक प्रमाणात शासनाकडून रुग्नालयांना उपलब्ध करुन देणे. महामगरपालीका क्षेत्रातील रुग्नालयांना ऑक्सिजन साठा कमी पडत असल्याने त्यांना पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावे.


  ऑक्सिजन व इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या संबंधीत व्यक्तींवर त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करुन सर्वसामान्यांना न्याय द्यावा. काही खाजगी रुग्णालय रुग्णांची आर्थिक कुवत बघुन बेड उपलब्ध असून सुद्धाबेड उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. अशा रुग्णालयांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. काही खाजगी रुग्णालय आरोग्यविमा असणाऱ्या रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकारत आहेतत्यांना समज देण्यात यावी. महानगरपलीकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता कोरोना विलगीकरण कक्षासाठी वापरण्यात येईल याची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.


      
            महारनगरपालीका क्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारे कल्याण व डोंबिवलीसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करुन त्यासाठी आवश्यक स्टाफची व्यवस्था करावी. महानगरपालीका हद्दीत राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची कठोर अमंलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या त्यांनी आयुक्तांकडे केल्या असून येत्या ७ दिवसांत याची अमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भालचंद्र पाटील यांनी दिला आहे. 
कोरोनामुळे नागरीकांना होणाऱ्या गैरनसोयी बाबत राष्ट्रवादीच्या पदा धिकाऱ्याने वेधले आयुक्तांचे लक्ष कोरोनामुळे नागरीकांना होणाऱ्या गैरनसोयी बाबत राष्ट्रवादीच्या पदा धिकाऱ्याने वेधले आयुक्तांचे लक्ष Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads