Header AD

कोविड वॅार रूमला महापालिका आयुक्तांची भेट


■कोणत्याही परिस्थितीत रुग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश वॅार रूमला स्वतः फोन करून खात्री केली....


ठाणे , प्रतिनिधी  ;  महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविड-19 चा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त करत असून कोविड-19 संदर्भात उपलब्ध ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड तसेच इतर मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोवीड वॅार रूमला आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देवून कोणत्याही परिस्थितीत रूग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. यावेळी महापालिका आयुक्तांनी वॅार रूमच्या फोनवर स्वतः फोन करून सर्व फोन सुरु असल्याची खात्री केली.


     कोरोना संदर्भात नागरिकांनी गैरसोय होवू नये, उपलब्ध हॉस्पिटलची माहिती जलदरित्या उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्यावतीने अद्ययावत वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे.  यामध्ये १० संपर्क क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वॅाररूमध्ये 24 तास अधिकाऱी, डॉक्टर्स आणि डेटा ऑपरेटर्स नियुक्त करण्यात आले आहेत.   


     कोवीड १९ वॉर रूमचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वॉर रूमला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व डेटा ऑपरेटर यांच्याशी संवाद साधत स्वतः सर्व मोबाईल नंबर चालू असल्याची खात्री करून घेतली. रूग्णांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होवू नये, बेड उपलब्धतेची अचूक माहिती देण्याच्या सूचना त्यांनी वॉर रूममधील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आदी उपस्थित होते.


         महापालिका या वॅार रूमध्ये तीन सत्रांमध्ये कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी +९१८६५७९०६७९१, +९१८६५७९०६७९२, +९१८६५७९०६७९३, +९१८६५७९०६७९४, +९१८६५७९०६७९५, +९१८६५७९०६७९६, +९१ ८६५७९०६७९७, +९१८६५७९०६७९८, +९१ ८६५७९०६८०१ आणि +९१८६५७९०६८०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.  दरम्यान नागरिकांनी एखादा क्रमांक व्यस्त लागल्यास दुसऱ्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केली आहे.

कोविड वॅार रूमला महापालिका आयुक्तांची भेट कोविड वॅार रूमला महापालिका आयुक्तांची भेट Reviewed by News1 Marathi on April 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads