Header AD

लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन दुकानांवर मानपाडा पोलिसांची कारवाई

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने १५ एप्रिल ते ३१ एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर पालिका आणि पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आला आहे.डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली.

  

         मानपाडा पोलिसांनी गेल्या चार दिवसात डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर, खोणी नाका,लोढा जन्शन,लोढा पालावा या ठिकाणी २९३ दुकानात विनामास्क, सॅनेटराईज,आरटीपीसीआर तपसणी न करणे या नियमाचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. कल्याण परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे,सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) बाबासाहेब पवार, पो.कॉ.मंदार यादव,पो.ह.संतोष चौधरी आणि कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली.


          या कारवाईत १ लाख १४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आली आहे.दरम्यान कोरीनावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. नागरिकांनी आपली जबाबदारीनुसार गर्दी टाळावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क परिधान करा, हात मिळवता भारतीय संस्कृतीनुसार हात जोडावे,दोघांमध्ये कमीत कमी ३ फुटाचे अंतर ठेवावे, दुकानदारांनी  स्वतः चा आणि समाजाचा विचार करून सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे असे आवाहन मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) पवार यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन दुकानांवर मानपाडा पोलिसांची कारवाई लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन दुकानांवर मानपाडा पोलिसांची कारवाई Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads