Header AD

७महिन्याच्या गरोदर कोविड महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती माता व नवजात बालक सुखरुप

 

■कल्याण मधील आर्ट गॅलरी लाल चौकी येथे होत्या ॲडमिट.....

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ७ महिन्याच्या गरोदर कोविड महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती झाली असून माता व नवजात बालक सुखरुप आहेत.  कल्याणमधील आर्ट गॅलरी लाल चौकी येथे त्या ॲडमिट होत्या.


 महापालिकेच्या आर्ट गॅलरी, कल्याण प. येथील कोविड रुग्णालयात ३७ वर्षाची एक ७ महिन्याची गरोदर महिला रुग्ण ॲडमिट होती. सदर महिला रुग्णाची प्रकृती क्रिटीकल असल्यामुळे तसेच तीचे सॅच्युरेशन कमी असल्यामुळे तीला आय.सी.यू. वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.  सोमवारी या महिलेची नैसर्गिक प्रसुती होवून तीने एका नवजात बालकास जन्म दिला. यावेळी महिलेची तपासणी स्त्रीरोगतज्ञा मार्फत करण्यात आली होती.

 

   महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णालयात महिलेची सुखरुप प्रसुती होण्याची ही पहिलीच घटना आहे. नवजात बालकाचे वजन कमी असल्यामुळे त्यास लहान मुलांच्या रुग्णालयात (NICU) दाखल करण्यात आले आहे. या गंभीर असलेल्या महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती आर्ट गॅलरीलाल चौकी येथील कोविड हॉस्पिटलमधील डॉ. अमित गर्गडॉ. मुशिरडॉ. संदिप इंगळे आदींच्या देखरेखीखाली झाली.

७महिन्याच्या गरोदर कोविड महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती माता व नवजात बालक सुखरुप ७महिन्याच्या गरोदर कोविड महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती माता व नवजात बालक सुखरुप  Reviewed by News1 Marathi on April 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads