Header AD

कोरोना महामारी दूर करण्यासाठी आरएसपी युनिट सोबत कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची साथ...

डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन आणि बीआरएस पी अधिकारी युनिटचा सहकार्याने  एमआयडीसी परिसरात आणि उद्योग समूहातील कामगारांना कोरोना पासून वाचवण्यासाठी आणि कोरोना संसर्गजन्य रोग घालवण्यासाठी आरएस ₹पी कमांडर  मणिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली, कामा संघटनेचेे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष एन पी टेकडे, राजू बेलूर, यांच्या उपस्थितीत विशेष नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती.संपूर्ण जगात कोरोना ने थैमान घातले आहे. प्रशासन आणि पोलीस विभाग, आरोग्य विभाग कोरोना ची साखळी तोडण्यासाठी पराकाष्टेने प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला आणि पोलीस विभागाला मदत करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्या शहरातूनच नावे तर संपूर्ण  महाराष्ट्रातून कोरोना संपवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यासाठी प्रत्येक कंपनीतून दोन जबाबदार अधिकारी विशेष पोलीस म्हणून काम पाहतील. व कंपनीत येणाऱ्या कामगारांचा आरोग्याबाबत चौकशी करून तशी नोंद करण्यात येईल. तसेच औद्योगिक परिसरात कोणत्याही प्रकारे शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही याचीही दखल घेतली जाईल. त्याचप्रमाणे वाहतूक स्वयंसेवक उपक्रमाबाबत असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत आणि अभिनंदन केले.  आर एस पी ठाणे जिल्हा कमांडर मणिलाल शिंपी यांनी कोरणा सारख्या आपत्कालीन परिस्थितीत आपली जबाबदारी व कर्तव्य याविषयी बोलताना सांगितले की, प्रशासनाला लोकाभिमुख सहकार्याची गरज आहे व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण आपल्या शहराला आपल्या कुटुंबाला कोरोना पासून वाचू शकतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतः आपल्या उद्योगसमूहातील सहकाऱ्यांचे आरोग्याबाबत काळजी घेणे कर्तव्य आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष व सचिव , अध्यक्ष समूहातील जबाबदार अधिकारी पदाधिकारी यांना यांनी विशेष पोलीस म्हणून कर्तव्य करावे असे जाहीर केले आहे. याबाबत आपल्या कंपनीतील कामगारांचे आरोग्य व यांच्या कौटुंबिक आरोग्य ची माहिती नोंद करणे आवश्यक आहे असे सांगितले. तसेच ठाणे जिल्हा वाहतूक पोलीस उपायुक्त  बाळासाहेब पाटील यांनी वाहतूक स्वयसेवक उपक्रम संपूर्ण जिल्ह्या तील वाहतूक व्यवस्था स्थिर करण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्यासारख्या उद्योजकांची आणि संस्थापकांची साथ प्रशासनाला महत्त्वाची आहे.  आपला संपूर्ण उपक्रमाची माहिती कमांडर शिंपी यांनी दिली. कामा संघटनेचे  अध्यक्ष देवेन सोनी यांनी संपूर्ण उपक्रमाची माहिती व कर्तव्याची जाणीव करून दिल्याबद्दल या उपक्रमाचे स्वागत केले व आम्हाला प्रशासनाने काहीतरी करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. व आमच्यावर ज्या विश्वासाने ही जबाबदारी दिली जात आहे ती आम्ही यशस्वी करण्यासाठी तयार आहोत.आम्हाला मिळणाऱ्या ओळखपत्राच्या व अधिकाराचा गैरवापर होणार नाही असा विश्वास  अध्यक्ष देवेन सोनी यांनी व्यक्त केला. यावेळी खजिनदार निखिल धूत आणि माजी अध्यक्ष मुरली अय्यर, एक्स प्रेसिडेंट एस वाय जोशी, निशान जोशी, झिंगाट मराठी मेट्रोपॉलिटनचे उदय वालावलकर, क्वालिटी इंडस्ट्रीजचे संजय दिक्षित, व सुनील इंडस्ट्रीजचे प्रदीप रुंगटा , इंडो अमाईन चे सुधाकर पाटील यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी आरएसपी अधिकारी राजेंद्र गोसावी, छोटू अहिरे, विजय भामरे यांच्यासह उल्हासनगरचे समादेशक सुधीर वराडकर उपस्थित होते.
कोरोना महामारी दूर करण्यासाठी आरएसपी युनिट सोबत कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची साथ... कोरोना महामारी दूर करण्यासाठी आरएसपी युनिट सोबत कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची साथ... Reviewed by News1 Marathi on April 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads