Header AD

रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी महापालिकेने केली मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था




कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धडपड आणि गैरसोय लक्षात घेता कल्याण डोंबिवली महापालिकेने रात्रीच्या वेळेत रुग्णांची योग्य ती व्यवस्था होण्यासाठी  रात्रीच्या वेळेत मध्यवर्ती वॉर रूम सुरु केलं आहे.


सध्याच्या कोविड साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत कोविड रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेषत: रात्रीचे वेळी होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातुन महानगरपालिकेने मध्यवर्ती वॉररूमची उभारणी केली असून हि वॉररूम संध्याकाळी ६ ते सकाळी १० या वेळेत कार्यरत रहाणार आहे.

 

 रूग्णासांठी लागणाऱ्या रुग्णवाहिकाबेड मॅनेजमेंन्ट यासाठी सायंकाळी ६ ते सकाळी १० यावेळेत भ्रमणध्वनी क्रमांक 8591377229 व 8591373936 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी महापालिकेने केली मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था रात्रीचे वेळी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी महापालिकेने केली मध्यवर्ती वॉररुमची व्यवस्था Reviewed by News1 Marathi on April 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads