Header AD

मनसेच्या पाठ पुराव्याला यश टिटवाळ्यातील बंद कोविड समर्पित हॉस्पिटल होणार पुन्हा सुरु
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवलीसह टिटवाळ्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याठिकाणी आधी सुरु असलेले कोविड रुग्णालय बंद करण्यात आले होते. मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनसेने हे होप्सितल पुन्हा सुरु करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. मनसेच्या या मागणीला यश आले असून टिटवाळ्यातील हे बंद कोविड समर्पित हॉस्पिटल पुन्हा सुरु होणार आहे.


                टिटवाळ्यामधील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता दिनांक ८ नोव्हेंबर २०२० रोजी टिटवाळा रुक्मिणी गार्डन येथील ७०  बेडचे सुसज्य अशा रग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले होते. मात्र त्यांनतर काही दिवसात हे रुग्णालय बंद करण्यात आले. याबाबत मनसेचे टिटवाळा उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील यांसह टिटवाळा येथील मनसेने  आवाज उठवत हे रुग्णालय लवकरात लवकर चालू करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या मागणीला अखेर यश आले असून उद्यापासून हे रुग्णालय चालू होणार आहे.

         

               सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुन्हा रुग्णालय चालू करण्यात यावे अशी मागणी २७ मार्च रोजी टिटवाळा उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मनसेचे माजी आमदार तथा सरचिटणीस प्रकाश भोईर, उपशहर अध्यक्ष दिनेश भोय, विभाग अध्यक्ष मधुकर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगर पालिका आरोग्य विभाग अधिकारी यांना करण्यात आली होती.  मनसेच्या निवेदनाची दखल घेऊन केडीएमसीने पून्हा नागरिकांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल सुरु केले असून टिटवाळ्यातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मनसेच्या पाठ पुराव्याला यश टिटवाळ्यातील बंद कोविड समर्पित हॉस्पिटल होणार पुन्हा सुरु मनसेच्या पाठ पुराव्याला यश टिटवाळ्यातील बंद कोविड समर्पित हॉस्पिटल होणार पुन्हा सुरु Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads