Header AD

भिवंडीत तरुणाचे अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ..

 
भिवंडी दि 14 (प्रतिनिधी ) भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची जयंती जगभरात मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असते. मात्र कोरोनाच्या विळख्यात अख्खे जगच सापडले आहे. याही वर्षी देशभरात करोनाचे संकट असल्यामुळे डॉ. आंबेडकर जयंती  एकत्रितपणे साजरे करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी, एका  अनुयायीने  डोक्यावरील  केसात 'हॅपी डॉ. आंबेडकर जयंती' व जयभीम असे अक्षर कोरून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने डॉ. बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.  शंकरकुमार  साहू असे या तरुणाचे नाव असून तो  मूळचा बिहार राज्यातील गया जिल्ह्याचा रहिवाशी आहे. सध्या तो भिवंडीतील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे (सुपरवायरज)चे काम करून भिवंडीतील हनुमान नगर परिसरात गेली १० वर्षापसून राहतो. 

 

गेल्या १० महिन्यात  १०वेळा डोक्यावरील केसात अक्षर कोरून कोरोना विषयी जनजागृती 


                     कोरोनाच्या काळात सुरवातीला भिवंडीत प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी त्यानेही लॉकडाऊन काळात डोक्यावरील केसात विविध प्रकारचे संदेश देणारे अक्षर कोरून तो राहत असलेल्या परिसरात कोरोना विषयी जनजागृती करीत होता. त्याने गेल्या  १०महिन्यात १० वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीसाठी अक्षरे कोरून सकाळ ,संध्याकाळ त्यावेळी नागरिकांना कोरोनापासून बचाव कसा करावा असे संदेश देत होता. 


मूळ गावातील जयंतीची आठवण ..  


               मूळ गावी डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती मोठ्या धुमडक्यात साजरी होत असल्याचे  शंकरकुमार याने सांगितले असून  भिवंडीत वर्षभर काम करीत असताना मूळगावी डॉ. आंबेडकर जयंती  साजरी करणासाठी मी दरवर्षी जात होतो. मात्र जयंतीच्या वेळीच दुसऱ्यांदा  कोरोनाच्या संकटामुळे जाता आले नाही. त्यामुळे  डोक्यावरील केसात 'हॅपी आंबेडकर जयंती' आणि जयभीम  अक्षरे कोरली  आणि  त्याचे चित्रीकरण करून   मूळ गाव असलेल्या बिहार तसेच मित्र व नातेवाईकांना फेसबुक व व्हाट्सअप ग्रुपवर पाठवून बाबासाहेबांना अभिवादन केल्याचे त्याने सांगितले.
भिवंडीत तरुणाचे अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन .. भिवंडीत तरुणाचे अनोख्या  पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ..   Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads