Header AD

कोळेगाव येथे सुरू असणाऱ्या आठवडी बाजारावर केडीएमसीची कारवाई

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना नियमांची पायमल्ली करीत कोळेगाव येथे आठवडा बाजार सुरू असल्याने मनपाच्या पथकाने धडक कारवाई करीत अनाधिकृत टपर्याशेडहातगाड्या निष्कसित केल्या.  


महापालिका आयुक्तडॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार  "ई" प्रभागक्षेत्रातील मौजे कोळेगाव येथे नियमांचे उल्लंघन करून सुरु असलेल्या आठवडी बाजारावर शुक्रवारी दिवसभरात धडक कारवाई करण्यात आली.  यात १ जोत्याचे अनाधिकृत बांधकाम ४७ अनाधिकृत शेड १३ अनाधिकृत टपऱ्या ५ अनाधिकृत हातगाड्या आणि ३अनाधिकृत  होर्डिंग्ज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.  


हि कारवाई  ई प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार आणि त्यांच्या अतिक्रमण विरोधी पथकानेमहापालिकेचे आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने व २ जेसीबीच्या सहाय्याने केली.

कोळेगाव येथे सुरू असणाऱ्या आठवडी बाजारावर केडीएमसीची कारवाई कोळेगाव येथे सुरू असणाऱ्या आठवडी बाजारावर  केडीएमसीची कारवाई Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads