Header AD

ऑक्सिजनच्या बचावा साठी डॉक्टरांनी रुटिंन सर्जरी पुढे ढकलण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राज्यात कोव्हीडचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा तीव्र प्रमाणात भासत असल्याने  डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या बचावासाठी रुटिंन सर्जरी पुढे ढकलाव्यात जेणे करून या ऑक्सिजनचा वापर कोव्हीड रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी होऊ शकेल असे आवाहन पालिका आयुक्तांनी खाजगी डॉक्टरांना केले आहे. राज्याच्या टास्क फोर्सने करोना मनेजमेंट बाबत केलेल्या सूचना अँडव्हाझर काढून माहिती देण्यासाठी पालिका आयुक्तांनी कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या टास्क फोर्सशी  आयोजित केलेल्या वेबिनरद्वारे चर्चा केली.


राज्य शासनाच्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने  केलेल्या सूचनांची माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की   रेमेडेसीव्हर इंजेक्शन बाबत सध्या तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. रेमेडेसीव्हर इंजेक्शन हे रुग्णाला लागण झाल्यापासून पहिल्या ९ दिवसात  तर पहिल्या ४ दिवसात प्लाझ्मा उपयोगी पडत आहे. त्यानंतर त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे टास्क फोर्सच्या डॉक्टराचा निष्कर्ष असून रेमेडेसीव्हर इंजेक्शन लाईफ सेव्हिंग इंजेक्शन नाही. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी इतर अनके इजेक्शन औषध, सोराईट्स आहेत त्याचा वापर करावा. डॉक्टरानी रुग्णाच्या नातेवाईकांनी रेमेडेसिव्हर आणि प्लाझ्मा साठी वेठीस धरू नये अशा सूचना सर्व डॉक्टरानां देण्यात आल्या.


औषधाचाऑक्सिजनचाप्लाझ्माच्या तुटवडा आणि ते मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाची सुरु असलेली धडपड या पार्श्वभूमीवर डॉक्टराच्या टास्क फोर्सने काढलेले निष्कर्ष प्रसिद्ध केले असून यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाची दमछाक मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. कोरोना रुग्णाने तातडीने उपचारासाठी दाखल होणे आवश्यक त्या पर्यायाचा रुग्णाचा जीव वाचविण्यसाठी वापर करावा अशा सूचना डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत.


 तर नागरिकांना आवाहन करताना आयुक्तांनी लक्षणे दिसणार्या रुग्णांनी स्वताच निर्णय न घेता अन्टीजेन टेस्ट करून घ्याहोम क्वारटाइन रुग्णाने प्रत्येक ४ तासाला ताप६ तासाला ऑक्सिजन तपासा आणि ६ मिनिटे चालून बघाधाप लागत असल्यास तातडीने रुग्णालयात दाखल व्हा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. या बेविणार मध्ये २५ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.


दरम्यान नव्याने रुग्णालये उभारण्याचे काम सुरु असले तरी ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर नव्या खाटांची संख्या अवलंबून असणार असून आजघडीला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रूग्णालयाची १२८ मेट्रिक टनाची ऑक्सिजनची मागणी आहे. त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने ताण वाढत असल्याचे आयुक्त म्हणाले. तसेच सर्व खाजगी रुग्णालयांना फायर ऑडीट करून घेण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ऑक्सिजनच्या बचावा साठी डॉक्टरांनी रुटिंन सर्जरी पुढे ढकलण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहन ऑक्सिजनच्या बचावा साठी डॉक्टरांनी रुटिंन सर्जरी पुढे ढकलण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads