Header AD

शिवसेनेच्या प्रयत्नाने गोग्रास वाडीत लसीकरण केंद्राला मान्यता

 

 




डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेनेचे विभागप्रमुख आमोल पाटील यांनी डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीत काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करावी अशी मागणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. पाटील यांच्या या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी सुचविलेल्या काही ठिकाणांपैकी प्रकाश विद्यालयात लसीकरण केंद्राला आयुक्तांनी मान्यता दिली आहेयेत्या २२ तारखेपासून सदर ठिकाणी दर आठवड्यातून प्रत्येक गुरुवार,शुक्रवारशनिवार या दिवशी सकाळी १० ते सायं ५ वाजे पर्यंतलसीकरण केंद्र सुरु होणार आहे.




             याबाबत पाटील यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे व शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रयत्नाने गोग्रासवाडी विभागात आपण चार लसीकरण केंद्र ठिकाण सुचविलेली होती.त्यातील प्रकाश विद्यालयात या ठिकाणीची पालिका प्रशासनाने पाहणी करून सदर ठिकाणी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रासाठी मान्यता मिळाली.त्याबद्दल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीमुख्यवैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील व डॉ.संदीप निबांळ्कर यांचे शिवसेना गोग्रासवाडी विभाग व विभागातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे.

शिवसेनेच्या प्रयत्नाने गोग्रास वाडीत लसीकरण केंद्राला मान्यता शिवसेनेच्या प्रयत्नाने गोग्रास वाडीत लसीकरण केंद्राला मान्यता  Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads