Header AD

राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराचे कल्याण तालुक्यातील दोन शेतकरी मानकरी


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुक्यातील गोवेली येथील रूपेश चोरगेवेहेळे येथील केशव देसले या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा कुषि पुरस्काराचा मान मिळाला आहे. कोकण विभागात येणाऱ्या कल्याण तालुक्यातील गोवेलीवेहेळे येथील शेतकरी रूपेश चोरगेकेशव देसले यांनी नोकरीला दुय्यम प्राधान्य देत, आपल्या पारंपारिक शेतीतुन नगदी पीके घेतली. फळबागांच्या माध्यमातून उत्पन्न घेत आपली आर्थिक घडी बसवित शेती व्यवसायातुन आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सावरला आहे.     

          

गोवेली येथील एकत्रित कुटुंबात राहणारे युवा शेतकरी रूपेश चोरगे हे उच्च शिक्षित असुन त्यांनी आँग्रिकलचर डिप्लोमा केला आहे. त्यांनी नोकरीला प्राध्यन न देता आपल्या एकत्रित कुटुंबाच्या ६ एकर जमिनीत आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय खतांचा वापर करीत वाढत्या शहरीकरणांच्या जगंलात आपली पांरपारिक शेती टिकवुन आंबाचिकुची फळबाग साकरली आहे.  त्यांनी पाँली हाँऊसच्या माध्यमातून देखील उत्पन्न घेतले असुन  ३० देशी गायीच्या माध्यमातून तसेच या गायीसाठी हिरव्या चारार्याचे उत्पादन आपल्या शेतीतुन घेत दररोज ७० लीटर दुध ते थेट ग्राहकापर्यंत पोहचवतात. सेंद्रिय खतांचा वापर करीत शेतीमध्ये उत्त्पादित केलेला ताजा भाजीपाला विक्रीतुन उत्पनाचा स्त्रोत वाढवुन शेतकऱ्यांसाठी आर्दश निर्माण केला आहे.


वेहेळे येथील शेतकरी केशव तुकाराम देसले यांच्या एकत्रित कुटुंबाची ८ एकर लागवडीखालील जमीन तसेच ४ एकर माळरान जमीन आहे. त्यांनी शेती व्यवसायला प्राध्यान्य देत आपल्या शेतीत पांरपारिक पीके घेत आधुनिकेतेची सांगड घालत  ऊसाची लागवड करून पश्चिम महाराष्ट्रात होणारे ऊसाचे पीक हे आपल्या कल्याण तालुक्यात सुद्धा घेऊ शकतो हे दाखवून दिले. फळबाग शेती अंतर्गत त्यांनी केळीचिकुआंबा लागवड करून आपल्या शेतीत चारा पीके घेत नंदवन फुलविले असुन या शेती उत्पन्नातून आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम पणे सावरली आहे. 


राज्य शासनाच्या कृषीपशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन २०१८ व २०१९ करिता कृषि पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषि मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत कृषि क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या नावे हे पुरस्कार निश्चित करण्यात आले असुन कल्याण  तालुक्यातील दोन शेतकरी हे शेतीनिष्ठ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.


सन २०१८ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराच्या १९ मानकऱ्यामध्ये कल्याण तालुक्यातील केशव तुकाराम देसलेरा.वेहळे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच २०१९ च्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराच्या १९ मानकऱ्यांमध्ये कल्याण तालुक्यातील गोवेली येथील रुपेश चोरगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कल्याण तालुका कृषी विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पुरस्कार प्राप्त दोन्ही शेतकऱ्यांवर सामाजातील सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे. 


गोवेली येथील रूपेश चोरगेवेहेळे येथील केशव देसले यांना राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला असुन कल्याण तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील शासकीय कुषि विषयक योजनाचा लाभ घेतमार्गदर्शन घेत आपल्या हक्काच्या शेतीतुन उत्पन्न घेत शेती व्यवसाला प्राध्यन दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया कल्याण तालुका कृषी आधिकारी शिल्पा निखाडे यांनी दिली.  


यबाबत गोवेली येथील शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी रूपेश चोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीशेतीला प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतीतुन उत्पन्न घेत त्यांच बरोबर दुग्ध दुभातेपशुपालन व्यवसाय करून आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून प्रगतीकडे वाटचाल करणे गरजेचे आहे."         

 

तर वेहेळे येथील शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त  शेतकरी केशव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  सांगितले की,  शेती व्यवसाय टिकविणे ही काळची गरज आहे. आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवित पंरपारिक शेत पीकाबरोबर नगदी पिकाची लागवड करीत उत्पन्न घेत आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत वाढवित शेती टिकवित शेती व्यसायला प्राध्यन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराचे कल्याण तालुक्यातील दोन शेतकरी मानकरी राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराचे कल्याण तालुक्यातील दोन शेतकरी मानकरी Reviewed by News1 Marathi on April 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads