Header AD

भिवंडीकर कोरोनाचा धोका गांभी र्याने केव्हा घेणार ,कडक निर्बंधात बाजार पेठेत होतेय मोठी गर्दी...






भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काल रात्री आठ वाजल्यापासून 15 दिवसाचा कडक निर्बंध  लागू केले  आहे मात्र आज पहिल्याच दिवशी भिवंडी शहरातील  तीनबत्ती - नजराणा   इथं मुख्य बाजार पेठेत भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी  मोठी  गर्दी करत आहे.   ना मास्क,ना सोशल डिस्टन्स आशा पध्द्तीने प्रकारे कडक निर्बंधाचे  तीनतेरा वाजल्याचे पाहावयास मिळत असून महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया  आणि पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांचे  अधिकारी आणि कर्मचारी यांना एवढी मोठी गर्दी कशी दिसत नाही असा सवाल निर्माण झाला आहे.


       
                  तर  महत्वाची बाब म्हणजे याच बाजारपेठेत निजापुरा पोलीस ठाण्याची चौकी आणि महापालिका कर्मचाऱ्यांची वसाहत सुद्धा आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.सद्या कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे भिवंडीतील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने कोरोनाचा धोका आणखी  वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कडक भूमिका घेऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.... 
भिवंडीकर कोरोनाचा धोका गांभी र्याने केव्हा घेणार ,कडक निर्बंधात बाजार पेठेत होतेय मोठी गर्दी... भिवंडीकर कोरोनाचा धोका गांभी र्याने केव्हा घेणार ,कडक निर्बंधात बाजार पेठेत होतेय मोठी गर्दी... Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads