Header AD

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची कोन गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट
भिवंडी दि 12 (प्रतिनिधी ) देशभरात  पंतप्रधान  नरेंद्र  मोदी   यांच्या  संकल्पनेनुसार 'टिका उत्सव' केला जात आहे. ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान सर्वाधिक लसीकरण करून कोरोना विरुद्ध जोमाने लढा द्यायचा आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील  यांनी कोनगांवचे सरपंच डॉ.रुपाली अमोल कराळे, उपसरपंच सौ.कृतिका प्रमोद पाटील,ग्रामविकास अधिकारी जीवन कृष्णा ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य  भरत नकुल जाधव, अशोक बळीराम म्हात्रे,जयंत गोपाळ टावरे,सौ. रेखा हनुमान म्हात्रे, सौ. उज्वला पांडुरंग कराळे,प्रमोद  हनुमान पाटील अध्यक्ष-भाजपा विधानसभा क्षेत्र, विजयानंद पाटील,गिरीष विठ्ठल म्हात्रे मा. सदस्य-पंचायत समिती भिवंडी, चंद्रकांत पाटील,हनुमान गणपत म्हात्रे,डॉ. अमोल कराळे, पांडुरंग कराळे, पंढरी भोईर,रमेश कराळे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थित भेट दिली.              या आरोग्य केंद्रांवर लसीकरण किती प्रमाणात होत आहे तसेच कशाप्रकारे होत आहे याची तपशीलवार साहेबांनी माहिती घेतली. येथील डॉक्टर तसेच आरोग्य केंद्र प्रमुखांशी संवाद साधला. नागरिकांशी देखील संवाद साधत त्यांना अधिकाधिक लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन केले.कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हाच एक रामबाण उपाय आहे. 'टिका उत्सव' अंतर्गत माझ्या लोकसभा क्षेत्रात अधिकाधिक लसीकरण व्हावे म्हणून मी वैयक्तिक लक्ष देत आहे असे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले आहे.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची कोन गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट भिवंडीचे  खासदार कपिल पाटील यांची कोन गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads