Header AD

कोरोना महा मारी मध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’ या ऑनलाईन विशेष संवादातून ‘धर्मांतर बंदी’ची मागणी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना महामारीच्या काळातही ख्रिस्ती मिशनरींद्वारे हिंदूंचे धर्मांतर हा मानवतेला मोठा कलंक असल्याचे परखड मत महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी व्यक्त केले. कोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’ या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते. या संवादातातून धर्मांतर बंदीची मागणी करण्यात आली.


कोरोनाच्या वैश्‍विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने सहयोग करण्याची आवश्यकता असताना या काळात हिंदूंचे धर्मांतर करणे एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत. हा मानवतेला एक मोठा कलंक आहे. नैसर्गिक आपत्तीयुद्धनक्षलवाद चालू राहिल्यास हिंदूंचे धर्मांतर चालूच राहीलहीच इच्छा धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी बाळगून आहेत. हिंदूंच्या देवतांविषयी घृणा निर्माण करून आणि ख्रिस्ती पंथ आचरणात आणून येशूचे नाव घेतल्यावर कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही’, असे सांगत ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत असे गंभीर प्रतिपादन इंदौर येथील श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रमाचे महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केले.


हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता चेतन जनार्दन या वेळी म्हणाले की, ‘अनफोल्डींग वर्ल्ड’ या संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डेविड रिव्हस् यांनी नुकतेचआमच्या संस्थेच्या मार्फत कोरोनाच्या काळात भारतात एक लाख हिंदूंचे धर्मांतर केले गेले आणि चर्चद्वारे 50हजार गावे दत्तक घेतली आहेत’ असे वक्तव्य केले. बायबलचे विविध भाषांत भाषांतर करण्याच्या नावाखाली या विदेशी संस्थेचे धर्मांतराचे काम आपल्या देशात चालू आहे. अजूनही कोरोनावर आपण पूर्णपणे नियंत्रण मिळवले नसतांनाही आपल्या या स्थितीचा गैरफायदा घेऊन हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या संस्थांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी हिंदूंनी केली पाहिजे.


रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे अनेकांना माहिती असूनही यावर खुली चर्चा होताना दिसत नाही. जेव्हा यावर खुली चर्चा होईल. तेव्हा जागृती व्हायला वेळ लागणार नाही. हल्लीच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी धर्मांतराचे खुले समर्थन केले आहे. अशी व्यक्ती पदावर कशी राहू शकते यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातही जागृती करण्याची गरज असल्याचे मत यावेळी मुंबई येथील वैद्यकीय तज्ञ डॉ. अमित थडानी यांनी व्यक्त केले. 

कोरोना महा मारी मध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’ या ऑनलाईन विशेष संवादातून ‘धर्मांतर बंदी’ची मागणी कोरोना महा मारी मध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’ या ऑनलाईन विशेष संवादातून ‘धर्मांतर बंदी’ची मागणी Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads