Header AD

ऑक्सिजनच्या कमतरते साठी कोल्हापूर पॅटर्न राबविण्याची मागणी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयात फक्त ८० लाखांत ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात अश्याप्रकारचे प्लांट उभारून संपूर्ण राज्यभरात कोल्हापूर पॅटर्न राबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी डॉ. राजू राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.   


कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांना ऑक्सिजन पुरवताना आरोग्य यंत्रणेला मोठी दमछाक करावी लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता कोल्हापूर जिल्हातील उपजिल्ह्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांन्ट फक्त ८० लाखात  लावण्यात आला आहे. असे प्लांट सर्व जिल्ह्यात लावल्यास ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.  त्यामुळे संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी संपूर्ण राज्यात कोल्हापूर पॅटर्न राबविण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते डॉ. राजू राम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

     
              या विषयाची मुख्यमंत्री कार्याल्याने दाखल घेत संबंधित मुख्य सचिव विभाग राज्य आरोग्य विभाग व नगराविकास विभाग २,यांना तात्काळ कारवाई साठी पाठविले आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे सकारात्मक उत्तर पाठविण्यात आला असल्याची माहिती डॉ. राजू राम यांनी दिली आहे. 
ऑक्सिजनच्या कमतरते साठी कोल्हापूर पॅटर्न राबविण्याची मागणी ऑक्सिजनच्या कमतरते साठी कोल्हापूर पॅटर्न राबविण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads