Header AD

बसपाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांचे निधन

 डोंबिवली ( शंकर जाधव ) बसपचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांचे  बुधवारी १४ एप्रिल रोजी कोरोनाने निधन झाले. निधन समयी ते ५९ वर्षांचे होते.  सुरुवातीच्या काळात रिपाई (आठवले गट) या पक्षात रिपाईचे प्रल्हाद जाधव , अंकुश गायकवाड यांच्या समवेत काम केले. त्यानंतर २००९ साली त्यांनी बसप मध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या कामामुळे मायावती यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष पद बहाल केले.          मूळचे विक्रोळीच्या असणारे किरतकर १९८० क्या दरम्यान डोंबिवलीत आले. डोंबिवलीकरांना काही चाळीत राहणाऱ्या नागरिकांना  त्यांनी घरे देखील मोफत दिली.  ३ एप्रिल पासून ते एम्स हॉस्पिटल येथे कोरोनावर उपचार घेत होते. मात्र बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डोंबिवली पूर्व येथील शिवमंदिर जवळील  स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी , मुलगा , भाऊ आणि इतर परिवार आहे.
बसपाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांचे निधन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांचे निधन Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads