Header AD

कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांचे आयोजन

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टी तर्फे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कल्याण पश्चिमेतील मिलिंद नगर येथे आयोजित या रक्तदान शिबिरात ५० हून अधिक जणांनी रक्तदान केले.


              कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदात्यांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी केले आहे. 


                कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना मास्कचे वाटप देखील करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष ब्रिज किशोर दत्त, कल्याण डोंबिवली प्रभारी सावर्डेकर, राष्ट्रवादी सेवादल जिल्हाध्यक्ष लालचंद तिवारी, आर.पी.आय.चे गणेश कांबळे, दत्ता फाळे, चंद्रकला गाडे, मीनाक्षी डुंबरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.   


कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांचे आयोजन कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांचे आयोजन Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads