Header AD

एसटी कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटपकल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (कामा) असोसिएशन च्या सहकार्याने आरएसपी अधिकारी युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली, असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी, आणि संघटनेचे सचिव राजू बैलूर यांच्या हस्ते कल्याण एसटी आगारातील वाहक, चालक, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, आणि टेक्निकल कामगार तसेच सफाई कामगार यांच्यासह २५०  कामगारांना प्रत्येकी दोन मास्क आणि सेनिटायझरची बॉटल वाटप करण्यात आले.एसटी बस म्हणजे सर्वसामान्य जनतेचे हक्काचे प्रवासी साधन यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे कोरना बाधा होऊ नये व या सेवेत तत्परता दाखवणारे जनहितासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रवाशांना सुखरूप त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोच करण्याची जबाबदारी एसटी कर्मचारी तसेच ड्रायव्हर कंडक्टर प्रामाणिकपणे करत आहेत. याची दखल घेऊन आगार प्रमुख तुकाराम साळुंखे आणि वाहतूक नियंत्रक प्रकाश शिनकर यांच्या प्रयत्नाने कामा असोशियनच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी देवेन सोनी यांनी सांगितले की, हि सेवा करण्याची संधी आम्हाला आरएसपी युनिटच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून आमच्याकडून एसटी कामगारांना सेवा देता आली त्याबद्दल आरएसपी युनिट बद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी एक्झिक्यूटिव्ह कमिटी मेंबर जयवंत सावंत आणि कैलास कारले यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. वाहतूक नियंत्रक प्रकाश सिनकर यांनी कल्याण मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे व आरएसपी अधिकारी युनिटचे आभार व्यक्त केले. 

एसटी कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप  एसटी कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप Reviewed by News1 Marathi on April 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads