Header AD

एसराइड कडून महामारी दरम्‍यान समुदायांना मदत करण्‍यासाठी ‘एसनेबर फिचर’ लाँच
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  समविचारी लोकांना समुदाय तयार करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी व्‍यासपीठ तयार करण्‍याच्‍या दृष्टिकोनासह सादर करण्यात आलेले एसराइड या भारताच्‍या सर्वात मोठ्या कारपूलिंग अॅपने आज एसनेबरच्‍या लाँचची घोषणा केली. हे अद्वितीय लोकेशन-आधारित डिस्‍कव्‍हरी अॅप नेबर्सना अवघड काळादरम्‍यान मदत घेण्‍यामध्‍ये आणि गरजूंना पाठिंबा देण्‍यामध्‍ये सक्षम करते.


अनेक कुटुंबं संकटाचा सामना करत आहेत आणि त्‍यांना अन्‍नकिराणा मालऔषधे व जीवनदायी साहित्‍यासह मदतीची गरज आहे. एसनेबर प्रत्‍येकाला शिजवलेले अन्‍नकिराणा मालऔषधे यांचा पुरवठा करण्‍यासोबत औषधेऑक्सिजन टँक्‍सहॉस्पिटल बेड्सलशी उपलब्ध असलेली लसीकरण केंद्रे अशा गोष्‍टींबाबत माहिती शेअर करण्‍याची आणि लसीकरण केंद्रांप्रर्यंत प्रवास करण्‍याची सुविधा देईल. गरजूंना व्‍यक्‍ती व नेबर्सशी संपर्क करून देण्‍यात येईलजे एका बटनाच्‍या क्लिकमध्‍ये साह्य करतील.


देशभरात पसरलेल्‍या कोरोनाविषाणूच्‍या दुस-या लाटेमुळे सर्व ठप्‍प झाले आहे आणि आरोग्‍यसेवा पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. हॉस्पिटल बेड्स व ऑक्सिजन पुरवठ्याच्‍या तुटवड्यामुळे नागरिक मदतीसाठी सैरावैरा पळत आहेत. विविध भागांमध्‍ये कडक लॉकडाऊन केल्‍यामुळे परिणाम झालेल्‍या प्रत्‍येकासाठी किराणा माल,औषधे व हॉस्पिटल्‍समध्‍ये जाण्‍यासाठी परिवहन सुविधा अशा आवश्‍यक बाबी समस्‍या बनल्‍या आहेत. अँड्रॉइड प्‍ले स्‍टोअरवर लाँच करण्‍याच्‍या काही मिनिटांमध्‍येच एसनेबर फिचरला १००हून अधिक रजिस्‍ट्रेशन्‍स मिळाली आणि ५० टक्‍के लोकांनी ते औषधेशिजवलेले अन्‍नकिराणा माल आणि लसीकरण केंद्रांसाठी परिवहन सेवा इत्‍यादींसारख्‍या देऊ शकणा-या सुविधांबाबत माहिती पोस्‍ट केली.

जागतिक सॉफ्टवेअर कंपन्‍या ईपीएएम आणि थ्रूवर्क्‍स यांनी या थोर कार्यामध्‍ये मदतीचा हात पुढे केला आणि त्‍यांच्‍या कर्मचा-यांना व्‍यासपीठाचा वापर करत गरजेनुसार मदत घेण्‍यामध्‍ये व देण्‍यामध्‍ये प्रोत्‍साहित केले. 


झपाट्याने वाढत असलेल्‍या कोविड- १९ प्रादुर्भावामध्‍ये लोक व समुदाय एकत्र येऊन एकमेकांना मदत करत असल्‍याचे पाहून खूपच चांगले वाटत आहे. एसनेबरसह आम्‍ही आमची विद्यमान तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि २ दशलक्षहून अधिक युजर्सच्‍या नेटवर्कमध्‍ये सुधारणा केली आहेज्‍यामुळे तळागाळापर्यंत सकारात्‍मक परिणाम घडून येऊ शकतो. लोकांना एकत्र येऊन समुदाय तयार करण्‍यासाठी व्‍यासपीठ देण्‍याचा यामागील मुख्‍य उद्देश आहेजेथे ते एकत्र येऊन एकमेकांना मदत व पाठिंबा देऊ शकतीलअसे मत एसराइडच्‍या सह-संस्‍थापक लक्षणा झा यांनी व्यक्त केले.

एसराइड कडून महामारी दरम्‍यान समुदायांना मदत करण्‍यासाठी ‘एसनेबर फिचर’ लाँच एसराइड कडून महामारी दरम्‍यान समुदायांना मदत करण्‍यासाठी ‘एसनेबर फिचर’ लाँच Reviewed by News1 Marathi on April 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads