Header AD

केडीएमसी क्षेत्रात कोरोना मुळे आतापर्यंत १३०० जणांचा मृत्यू


■कल्याण डोंबिवलीत ११८८ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ९८ हजारांचा टप्पा....


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्राकोरोनामुळे आतापर्यंत तब्बल १३०० नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असून  कोरोना रुग्णांनी ९८हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ११८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १२४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहेत.



          आजच्या या ११८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ९८,७८० झाली आहे. यामध्ये १६,३८८ रुग्ण उपचार घेत असून ८१,०९२रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२१६कल्याण प – ३८८डोंबिवली पूर्व  ३९६डोंबिवली प – १११मांडा टिटवाळा – ५८, तर  मोहना येथील १९ रुग्णांचा समावेश आहे.


केडीएमसी क्षेत्रात कोरोना मुळे आतापर्यंत १३०० जणांचा मृत्यू केडीएमसी क्षेत्रात कोरोना मुळे आतापर्यंत १३०० जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads