Header AD

रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे

 

ऑक्सिजन प्रमाणे नायट्रोजनचा पुरवठा करणारे छोटे टॅंकरही ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरले जाणार 


■रिलायन्सच्या जामनगर प्लँट मधून महाराष्ट्रासाठी 100 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार 


पनवेल , 13 एप्रिल  :  रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तळोजा येथील लिंडे कंपनीच्या ऑक्सिजन कंपनीला भेट देऊन त्यांनी या कंपनीच्या कामाचा आढावा घेतला. 


              गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी नक्की काय करता येईल, याचा आढावा त्यांनी आज या कंपनीसोबतच्या आढावा बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त, ठाणे व रायगड जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वय साधण्यात येणार आहे.


                 लिंडे कंपनीकडून सध्या मुंबई, ठाणे,रायगड, पालघर यांच्यासह पुणे, नगर, औरंगाबाद येथेही ऑक्सिजन पुरवठा होतो. ही कंपनी सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने २३० मेट्रिक टन ऑक्सिजन जनरेट होतो. त्यामुळे या कंपनीतून होणारा ऑक्सिजन पुरवठा आणि त्याच वितरण सुरळीत व्हाव तसेच त्याना येणाऱ्या काही अडचणी तातडीने सोडवण्यात याव्यात, असे निर्देश श्री शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. 


               यात प्रामुख्याने ऑक्सिजन वितरणाचे विभागवार योग्य नियोजन करणे. मिळणाऱ्या ऑक्सिजनचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या माध्यमातून योग्य नियोजन करणे, ऑक्सिजन पुरवणाऱ्या ट्रकना काही विशिष्ट भागातून जाताना सोबत पोलिस संरक्षण देणे, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या ड्रायव्हर्सना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, आणि त्यांचा कोरोना योद्धे म्हणून समावेश करुन त्यातील ४५ वर्षावरील चालकांचे तत्काळ लसीकरण पूर्ण करणे याला प्राधान्य देण्यात येणार असल्याच श्री. शिंदे यांनी सांगितलं. 


                   याशिवाय खासगी रुग्णालयाना ज्या छोट्या पुरवठा धारकाकडून ऑक्सिजन पुरवठा होतो त्यांच्या स्टोरेज आणि पुरवठा क्षमतेत वाढ करण्याचा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. याशिवाय  यापुढे ऑक्सिजन प्रमाणेच नायट्रोजन पुरवठा करणारे छोटे टँकर देखील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरण्याची मुभा शासनाने दिली असल्याने त्याद्वारे छोट्या खासगी रुग्णालयाना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 


               या बैठकीला कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर, पनवेलचे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, एफडीएचे अधिकारी आदी उपस्थित होते.


रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधून १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळणार 


             ऑक्सिजन पुरवठयातील अडचणी दूर करतानाच सध्या असलेली वाढती मागणी लक्षात घेता रिलायन्स कंपनीला वाढीव ऑक्सिजन देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार रिलायन्सच्या जामनगर प्लांट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads